Uncategorized

……” कर्जत बौद्ध नगर येथील शोभा हरिश्चंद्र यादव यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन “…..

" पुण्यानुमोदन व शोकसभेस " कर्जत तालुक्यातील बहुजन वर्ग एकवटला !

वंचित बहुजन आघाडीची ” माऊली आणि सावली ” हरपली…..

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

कर्जत तालुक्यातील फुले – शाहू – आंबेडकरी चळवळीचा ढाण्या वाघ, आंबेडकरी चळवळीतील निष्ठावान नेतृत्व , स्वाभिमानी नेते , वंचित बहुजन आघाडीचे निर्भीड नेतृत्व तथा जिल्हा नेते ” हरिश्चंद्र गणपत यादव ” यांचे १२ नोव्हेंबर २०२५ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असताना चारच महिन्याने गुरुवार दिनांक २६ मार्च २०२६ रोजी त्यांची पत्नी ” शोभा हरिश्चंद्र यादव ” यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या या अकाली निधनाने वंचित बहुजन आघाडी , त्यांचे यादव कुटुंब , नातेवाईक यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला . आज रविवार दिनांक २९ मार्च २०२६ रोजी त्यांचा पुण्यानुमोदन व शोकसभेचा कार्यक्रम ” यादव फॉर्म हाऊस ” कर्जत येथे संपन्न झाला . यावेळी कर्जत खालापूर तालुक्यातील बहुजन वर्ग , बौद्ध समाज अखेरची श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एकवटला होता . 

         

कर्जत तालुक्यात कर्जत शहरातील बौद्ध नगर येथे हरिश्चंद्र दादा यादव व त्यांची पत्नी शोभा यादव हे वास्तव्यास होते . गेली ४० ते ४५ वर्षे राजकीय – सामाजिक – धार्मिक – शैक्षणिक – सांस्कृतिक क्षेत्रात हरिश्चंद्र दादा यादव यांनी ” स्वाभिमानाने ” काम केले . अन्यायावर न्याय मागण्यासाठी त्यांची ” झुंज ” प्रखरतेची असायची . आर पी आय , भारिप बहुजन महासंघ व आता वंचित बहुजन आघाडी असा त्यांचा राजकीय प्रवास अत्यंत संघर्षाचा होता. या सर्व कठीण संघर्षात त्यांची पत्नी ” शोभा ” यांनी सावली सारखी साथ त्यांना दिली होती . बहुजनांचे नेते तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राजकीय वारसदार ॲड . प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे हरिश्चंद्र दादा व शोभा वहिनी यांचे अत्यंत निकटचे संबंध होते . शोभा वहिनी या धार्मिक क्षेत्रात भारतीय बौद्ध महासभा यांत ते मार्गदर्शक होत्या . दिवंगत हरिश्चंद्र गणपत यादव यांच्या त्या पत्नी असल्याने ” सावली ” बनून आलेल्या कार्यकर्त्यांचे जेवण , चहा नाश्ता पाणी त्या आदराने विचारायच्या . वंचित बहुजन आघाडीचे खंदे समर्थक ” लोकेश यादव व प्रणेश यादव ” या दोन मुलांना त्यांनी चांगले संस्कार देऊन छत्रपती – फुले – शाहू – आंबेडकरी – चळवळीत त्यांच्या विचारांचे पाईक बनवले आहे . 

       

या माऊलीच्या निधनाने वंचित बहुजन आघाडीचे दादा व वहिनी हे दोघे ” सावली व माऊली ” हरपली असून आम्ही खऱ्या अर्थाने पोरके झालो असल्याची खंत त्यांच्या शोकसभेत कार्यक्रमाचे अध्यक्ष दिपक दादा मोरे यांनी व्यक्त केली . यावेळी या पुण्यानुमोदन कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव धर्मेंद्र दादा मोरे , जिल्हा उपाध्यक्ष सुनील आप्पा गायकवाड , विद्यार्थी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड कैलास मोरे , एस आर पी जिल्हाध्यक्ष उत्तम भाई जाधव , आझाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिन भालेराव , नगरसेविका सुमिता योगेश गायकवाड , सामाजिक कार्यकर्ते योगेश आप्पा गायकवाड , माजी नगरसेवक दिपक मोरे , शरद दादा मोरे , राहुल सूर्यवंशी , बी एस पी शहर अध्यक्ष सचिन चव्हाण , गणेश मोरे , अनिल पवार , चेतन सुर्वे , आर पी आय चे सिद्धांत डाळींबकर , संतोष आप्पा रोकडे , सोमनाथ पालकर , कृष्णा जाधव , मारुती चव्हाण , वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी , कार्यकर्ते , भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी , पत्रकार बंधू , यादव कुटुंबीय , बहुजन वर्ग , बौद्ध बांधव , भगिनी , महिला वर्ग , कर्जत बौद्ध नगर येथील जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!