Uncategorized

……” हे उपोषण सोडले नाही तर स्थगित , कर्जत तालुका ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष राहुलजी डाळींबकर यांचा निर्धार “…..

आमदार " महेंद्र शेठ थोरवे " यांची यशस्वी मध्यस्थी !

एप्रिल महिन्यांपासून ” प्रलंबित बिले ” मिळणार……

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

कर्जत तालुका हा बहुसंख्य ” आदिवासी ” बहुल भाग आहे . आदिवासी भाग व आदिवासी बांधवांची आर्थिक उन्नती व्हावी , त्यांच्या भागाची सुधारणा व दळण वळणाची व्यवस्था व्हावी , यासाठी राज्य शासन करोडो रुपयांचा निधी देऊन विकास कामे करत असतात . हि विकास कामे करताना तालुका पातळीवर ठेकेदारांना केलेल्या कामांची बिले वेळेवर मिळत नसल्याने १० ते १५ टक्के मिळणाऱ्या फायद्यासाठी वर्षेनुवर्षे वाट बघावी लागते , मात्र या दरम्यान कर्जे काढून व उधारी करून केलेली कामे डोईजड होऊन विविध समस्यांना सामोरे जावे लागत असते , प्रसंगी ठेकेदारांना कर्जास सामोरे जाऊन ” आत्महत्येस ” देखील सामोरे जाण्याची वेळ राज्यात आलेली असताना , हि सीमा पार केल्यावर कर्जत तालुक्यात केलेल्या कामांची प्रलंबित बिले जोवर मिळत नाहीत , तोवर आम्ही बेमुदत उपोषण सोडणार नाही , अशी आर पार ची लढाई लढत कर्जत तालुक्यातील ठेकेदार संघटनेने अध्यक्ष राहुल डाळींबकर यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत उपोषणाचा ” एल्गार ” दिनांक २५ मार्च २०२६ पासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्जत कार्यालयाच्या आवारात केला होता . या आंदोलनाला तालुक्यातील ३५ ठेकेदारांनी पाठिंबा दिला होता.

           उपोषणाच्या दुसऱ्याच दिवशी आमदार महेंद्र शेठ थोरवे, पनवेलचे कार्यकारी अभियंता संदीप चव्हाण आणि उपअभियंता राहुल देवांग यांनी गुरुवारी संध्याकाळी उपोषण स्थळी भेट दिली. यावेळी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी यासंदर्भात ” मुख्यमंत्र्यांशी ” चर्चा केली असून तसेच एप्रिलमध्ये आदिवासी मंत्री यांनी जास्तीत जास्त निधी देण्याचे कबूल केले असून उपोषण सोडावे, अशी विनंती त्यांनी केली. म्हणूनच त्यानंतर आमदार महेंद्र शेठ थोरवे आणि कार्यकारी अभियंता यांच्या शब्दाला ” मान ” देऊन हे उपोषण सोडले नसून स्थगित केले आहे , असे कर्जत तालुका ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष राहुल डाळिंबकर यांनी सांगितले. 

          या आर पार च्या ” बेमुदत आंदोलनाला ” कर्जत तालुका ठेकेदार संघटनेचे सचिव उदय दादा पाटील यांच्यासह संभाजी जगताप, सुनील भालीवडे , पंढरीनाथ पिंपरकर , उत्तम शेळके, राजेश जाधव, गोकुळ खडे, भास्कर दिसले, भूषण भोईर, इरेश्वर गायकवाड, सूर्यकांत चंचे, बाळू ऐनकर, प्रसाद भोपतराव, प्रमोद खडे, शरद बडेकर, प्रमोद म्हसे, लहू श्रीखंडे , जब्बार सहेद , सचिन ओसवाल, दशरथ पोसाटे , आदींनी पाठिंबा दिला होता .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!