Uncategorized

…..” मराठी नव वर्ष गुढी पाडव्याला अवसरे येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन “……

" ग्रामस्थ मंडळ अवसरे व जय भवानी ग्रामस्थ मंडळाचा " स्तुत्य उपक्रम !

कर्जत खालापूर तालुक्यातील ५३५ वे रक्तदान शिबिर , ” राजाभाऊ कोठारी सरांचे ” नियोजन……

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

” मराठी नव वर्ष गुढी पाडवा ” या पवित्र सणाचे औचित्य साधून कर्जत तालुक्यातील ” अवसरे ” येथे गुरुवार दिनांक १९ मार्च २०२६ रोजी कर्जत- खालापूर तालुक्यातील ५३५ वे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन सकाळी १०.०० ते ०४.०० वाजेपर्यंत श्री भवानी माता मंदिर – अवसरे येथे ” ग्रामस्थ मंडळ अवसरे व जय भवानी ग्रामस्थ मंडळाने ” आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी एकूण ३२ रक्तदात्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय – सामाजिक व मानवतावादी कार्य करून सहकार्य केले . तसेच या नववर्षाचे दिवशी श्री सत्यनारायणाची महापूजा , हरिपाठ , महाप्रसाद व भजन आदी अनेक धार्मिक कार्यक्रमाचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले होते .

       

या रक्तदान शिबिरात रक्त संकलनाचे काम बदलापुर येथील ” माया रक्त केंद्राचे ” एम.एस.डब्ल्यू अजय भिसे व इतर रक्त सेवकांनी उत्तम पद्धतीने केले . तर रक्तदान शिबिर व इतर अनेक धार्मिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व अवसरे ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले . 

         

या रक्तदान शिबिरात रक्तदान करणारे रक्तदाते व इतर शिबिरास सहकार्य करणाऱ्या सर्वांचे तसेच ग्रामस्थांचे आभार ” सार्वजनिक रक्तदाते तथा महा रक्तविर राजाभाऊ कोठारी सर ” यांनी व ” ग्रामस्थ मंडळ अवसरे ” तसेच ” जय भवानी ग्रामस्थ मंडळ अवसरे ” यांनी व्यक्त केले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!