Uncategorized

…..” कर्जत नगर परिषद हद्दीतील भिसेगाव औदुंबर सोसायटी येथील रस्ता कधी होणार ? “…..

सहा वर्षे भिसेगाव नागरिक रस्त्याच्या प्रतिक्षेत !

” भूमीपूजन ” होऊनही अद्याप रस्ता नाही , ” भिसेगाव नागरिकांचा ” संताप अनावर……

भिसेगाव-कर्जत / सुभाष सोनावणे-

कर्जत नगर परिषद हद्दीतील ” भिसेगाव प्रभागात ” एस टी स्टँड कडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या ” औदुंबर सोसायटी परिसरात ” अंतर्गत रस्ता गेली सहा वर्षे भूमिपूजन होऊन उलटली तरी रस्त्यांचे काम अद्यापी मार्गी लागले नसल्याने कर्जत नगर परिषदेच्या विरोधात नागरिक संताप व्यक्त करत आहेत . हा रस्ता व मोरी , गटार झाला नसल्याने पावसाळ्यात डोंगरावरून येणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे नागरिकांना पुराचा तडाखा दरवर्षी होत असून , हिच का पालिकेची विकास कामे , असा संतप्त सवाल भिसेगाव ग्रामस्थ करताना दिसत आहेत .

   

 भिसेगाव प्रभागातील विकास कामाबाबत कर्जत नगर परिषद नेहमीच ” दुजाभाव ” देत असून एस टी स्टँड कडे जाणाऱ्या रस्त्यावर पाल टॉवर इमारतीच्या मागे असलेल्या औंदुबर अपार्टमेंट कडील हा रस्ता पुढे परिसरात जातो . या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन सहा वर्षांपूर्वी झाले आहे . सन २०१८ – १९ साली त्यावेळी राष्ट्रवादीची सत्ता होती , त्यानंतर शिवसेनेची सत्ता कालावधी पूर्ण होऊनही संपला , तरीही हा रस्ता झालाच नाही . कर्जत नगर परिषदेच्या ” अंकुशहीन ” कामामुळे ठेकेदारावर कुठलीच कारवाई झाली नाही . विशेष म्हणजे या ठेकेदाराला ६ वेळा मुदतवाढ दिली होती , तरीही ठेकेदाराने हा रस्ता केलेला नाही . त्यामुळे दर पावसाळ्यात डोंगरावरून येणाऱ्या व उलट्या दिशेने जाणारे पाण्यामुळे नागरिकांना अनेक संकटाला सामोरे जावे लागले , पाण्यातून रस्ता शोधावा लागतो , मात्र अद्यापपर्यंत रस्ता होण्याची कृती का झालेली नाही ? याचे कोडे अद्यापी उलगडत नाही . 

     याबाबतीत वारंवार तक्रारी करून देखील पालिका प्रशासन ” धृतराष्ट्राची ” भूमिका घेऊन ठेकेदाराला पाठीशी घालण्याचे काम गेली अनेक वर्षे करत असल्याचा आरोप येथील नागरिक करत आहेत . तर आता नव्याने टेंडर काढावे लागणार की कसे ? काम न करणाऱ्या त्या ठेकेदारावर दंडात्मक कारवाई का होत नाही ? याची उत्तरे गुलदस्त्यात असून नव्याने आलेल्या कर्जत नगर परिषदेच्या सत्ताधाऱ्यांनी व मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनी लवकरात – लवकर रस्त्याचे काम मार्गी लावावे , अशी संतप्त मागणी भिसेगाव येथील नागरिक व महिलावर्ग करत आहेत .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!