…..” केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांना कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड यांनी दिल्या शुभेच्छा “……
मुंबई येथे सह्याद्री अतिथिगृहात आढावा बैठक संपन्न !

आर पी आय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ” केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब ” तिसऱ्यांदा राज्यसभेवर……
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ” रामदासजी आठवले साहेब ” हे विजयाची ” हॅट्रिक ” करत तिसऱ्यांदा राज्यसभेवर ” खासदार ” म्हणून निवडून गेल्याने त्यांचे स्वागत – शुभेच्छा व आढावा बैठकीचे नुकतेच आयोजन शुक्रवार दिनांक ६ मार्च २०२६ रोजी मुंबई – सह्याद्री अतिथीगृह येथे त्यांच्या केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रशासकीय अधिकारी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी यांची संयुक्त आढावा बैठक पार पडली. यावेळी अनेकांनी आठवले साहेबांना शुभेच्छा दिल्या , यावेळी आर पी आय कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड यांनी देखील केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांना भेटून पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा दिल्या व आशीर्वाद घेतले .
यावेळी झालेल्या बैठकीत १४ एप्रिल २०२६ भारतीय घटनेचे शिल्पकार – विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, ६ डिसेंबर २०२६ महापरिनिर्वाण दिन , २० मार्च महाड येथील ऐतिहासिक सत्याग्रह ” सामाजिक सबलीकरण दिन (Social Empowerment Day) क्रांती दिन ” २० मार्च संदर्भातील कार्यक्रमांवर चर्चा करण्यात आली. दरवर्षी महाड येथे साजरा होणारा हा ऐतिहासिक सामाजिक सबलीकरण दिन’ (Social Empowerment Day) क्रांती दिन २० मार्च २०२६ दिन यंदा ९९ वा असून पुढील वर्षी १०० वा शताब्दी ” क्रांती दिन ” साजरा होणार आहे. या अनुषंगाने महाड येथील क्रांतीभूमी, परिसर व ऐतिहासिक वास्तूंचे जतन व सुशोभीकरण करून त्या स्थळाचा राष्ट्रीय स्मारकाच्या धर्तीवर विकास करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना माननीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या मार्फत सूचना देण्यात आल्या.
या बैठकीस कोकण – रायगड विभागातून प्रकाशजी मोरे यांनी प्रलंबित कामाचा प्रस्ताव मांडला, इतर सर्व महाराष्ट्रातील – मुंबईतील मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी ” केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब ” यांची ” तिसऱ्यांदा ” राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल रायगड जिल्ह्यातून कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड , नितीन मोरे – खालापूर उपाध्यक्ष , मोहनिषजी गायकवाड – मुख्य प्रभारी पनवेल महानगरपालिका क्षेत्र , प्रभू मधुकर जाधव – उपाध्यक्ष पनवेल महानगरपालिका क्षेत्र , विजय गायकवाड – पनवेल विधानसभा अध्यक्ष , आदी पदाधिकाऱ्यांनी आढावा बैठकीस उपस्थित राहून ” केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब ” त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.




