Uncategorized

…..” कर्जत मध्ये शिवजयंती निमित्त एक आगळी वेगळी मानवंदना “……

" शिवशंभो युवा हायकर्स कर्जत व कै. श्रीधर राजाराम भुर्के कलामंच " यांचा पुढाकार !

शिवरंग – २०२६ चित्रकला स्पर्धेत २२५ ” विद्यार्थ्यांचा ” उत्स्फूर्त सहभाग…..

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

महाराष्ट्राचे आराध्य दैवत कुळवाडी भूषण ” छत्रपती शिवाजी महाराज ” यांच्या ” ३९६ ” व्या जयंती निमित्त रॉयल गार्डनच्या भव्य सभागृहात श्री . निलेश शेठ चौडीये यांचे सहकार्याने कर्जत येथे ” शिवरंग – २०२६ चित्रकला स्पर्धेचे ” आयोजन ” शिवशंभो युवा हायकर्स कर्जत व कै. श्रीधर राजाराम भुर्के कलामंच ” यांच्या पुढाकाराने नुकतेच करण्यात आले होते . या स्पर्धेत कर्जत परिसरातील शाळा व विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. छोटा गट पाचवी ते सातवी व मोठा गट आठवी नववी च्या एकूण २२५ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला.

           चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन शिवशंभो युवा हायकर्स कर्जत संस्थेचे अध्यक्ष विकास दादा चित्ते, कै .श्रीधर राजाराम भुर्के कला मंचाचे भालचंद्र घोडके , रॉयल गार्डनचे संचालक निलेश शेठ चौडीये , विशाल सुरावकर सर , प्रदीप प्रमोद बागल साहेब , व प्रदिप भुर्के यांचे हस्ते संपन्न झाले. कु. हार्दिक दिनकर गायकवाड हिने छत्रपती शिवाजी महाराजांची ” गारद ” गाऊन स्पर्धेची सुरुवात झाली. यावेळी शिवरायांची आरती बोलण्यात आली. या शिवमय वातावरणात चित्रकला स्पर्धेस सुरुवात फार उत्साहात झाली.

या चित्रकला स्पर्धेची संकल्पना विशाल सुरावकर सर यांची होती. त्यांनी स्पर्धेच्या सुरुवातीला स्पर्धेबाबत माहिती व नियमावली सांगितली. स्पर्धेत सहभागी झालेले विद्यार्थी चित्र काढण्यात एकदम तल्लीन झाले होते की , त्यांचे चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.

         आपल्या मुलांचे कौतुक करण्यासाठी , व स्पर्धा पाहण्यासाठी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवजयंतीनिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेचे पालकांनी भरभरून स्वागत केले व स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी पालकांशी संवाद साधण्यात आला व शिवशंभो युवा हायकर्सचे अध्यक्ष विकास दादा चित्ते यांनी संस्थेच्या विविध उपक्रमाची माहिती पालकांना दिली. स्पर्धेला भेट देण्यासाठी संस्थेचे मार्गदर्शन मंडळ पदाधिकारी व नगरसेवक राजाभाऊ कोठारी सर , कर्जत नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष संतोष दादा पाटील , सामाजिक कार्यकर्ते मुकुंद मोधळे, प्रशांत उगले ,अभिनव ज्ञान मंदिर शाळेचे मुख्याध्यापक विलास बबन शिंदे सर, कर्जत परिमंडळाचे उपविभागीय पोलीस अधिकारी ( DYSP ) राहुल गायकवाड सर, गडप्रेमी नितीन पाटील ,पत्रकार विजय भाऊ मांडे , अपर्णा अंकुश चव्हाण, सामाजिक कार्यकर्ता दिनेश कडू , डॉ. भोपतराव यांनी भेट दिली व उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले. या प्रसंगी संस्थेकडून मान्यवरांचा शाल , श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी ( DYSP ) राहुल गायकवाड सर यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक करुन संस्थेच्या भावी उपक्रमासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. शिवव्याख्याते सुदर्शन खांबल यांचे ओघवत्या वाणीने मुलांना व उपस्थित पालक वर्गास मंत्रमुग्ध केले.

         याप्रसंगी कु. खुशी नितीन पाटील , इयत्ता ४ थी . वय १० हिने आतापर्यंत ” १०८ ” किल्ले भटकंती पुर्ण केल्याने सन्मानपत्र देऊन तिचा विशेष सत्कार करण्यात आला. आंतरराष्ट्रीय किर्तीचे चित्रकार पराग बोरसे , हरी फुलवरे यांनी मोठ्या गटासाठी व प्रदिप घाडगे , मानसी सुळे यांनी लहान गटासाठी परिक्षक म्हणून संस्थेचे विनंती नुसार परिक्षण केले. याप्रसंगी परिक्षकांचा यथोचित सन्मान करण्यात आला. कै. श्रीधर राजाराम भुर्के कलामंच चे भालचंद्र भुर्के यांनी कै. भुर्के गुरुजी यांचे कार्याची माहिती दिली. 

        चित्रकला स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे – मोठा गट – प्रथम क्रमांक – तन्मय नितीन भोईर – गिता सुधाकर घारे स्कुल खांडपे. ८ वी.

व्दितीय क्रमांक – प्रांजल सचिन कोळी – अभिनव ज्ञान मंदिर, कर्जत इयत्ता ८ वी.

तृतीय क्रमांक – जिज्ञासा जगदिश मुने – शारदा मंदिर, इंग्लिश मिडीयम स्कूल, कर्जत १० वी. 

उत्तेजनार्थ – अस्मी अनिलकुमार पाटील – गुड शेफर्ड स्कुल, गुंडगे इयत्ता ८ वी.

उत्तेजनार्थ – सर्वेश भरत गाडे – इंग्लिश मिडीयम स्कूल, कडाव ८वी.

विशेष उत्तेजनार्थ – कश्यप विश्वनाथ गायकवाड – इंग्लिश मिडीयम स्कूल, कडाव ९ वी.

विशेष उत्तेजनार्थ – आर्या विशाल सरमुकादम – के.ई. एस इंग्लिश मिडीयम स्कूल कर्जत .९ वी.

छोटा गट – प्रथम क्रमांक – शुभम सुरेंद्र पांडा – शारदा मंदिर , कर्जत. ६ वी. व्दितीय क्रमांक – गौरांग हनुमंत चौधरी – अभिनव ज्ञान मंदिर, कर्जत इयत्ता ६ वी.

तृतीय क्रमांक – ओम निलेश ठाकरे – गिता सुधाकर घारे स्कुल खांडपे. इयत्ता ६ वी

उत्तेजनार्थ – अभय सुधीर बनसोडे – के. ई. एस. इंग्लिश मिडीयम स्कूल. कर्जत ५ वी. 

उत्तेजनार्थ – विना प्रकाश पवार – के. जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूल, कर्जत ७ वी. 

विशेष उत्तेजनार्थ – आभा राहुल बोरसे – के. ई. एस. इंग्लिश मिडीयम स्कूल. कर्जत ७ वी.

विशेष उत्तेजनार्थ – मिताली सागर करडे – डॉ. रामहरी घोटे , शिशु मंदिर, खोपोली .७ वी .

           या ऐतिहासिक कार्यक्रमाचे सुत्र संचालन गौरव विकास चित्ते व मंजिरी महेंद्र कर्वे यांनी अतिशय सुंदर करुन कार्यक्रमात रंगत आणली. आभार प्रदर्शन विशाल सुरावकर सर यांनी केले. 

रायगड विर ” शैलेश सातपुते ” यांनी रायगडावर का जावे ? रायगड का बघावा ? याबाबत उपस्थितांना माहिती देऊन रायगडावर येणेसाठी सहकार्य करण्याची तयारी दाखवली. खुशी नितीन पाटील, हिने खणखणीत आवाजात ” श्री छत्रपती शिवाजी महाराज ” यांची ” गारद ” बोलून चित्रकला स्पर्धेची सांगता करणेत आली. या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने पुढील वर्षी देखील अधिक विविध उपक्रम राबविणार असल्याचे मत , विकास दादा चित्ते – अध्यक्ष , शिवशंभो युवा हायकर्स. कर्जत यांनी व्यक्त केले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!