…..” भिसेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी “……
कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षा " सौ पुष्पाताई दगडे " यांच्या शुभहस्ते " छत्रपतींना " पुष्पहार अर्पण !

भिसेगाव नगरसेवक ” विजूभाऊ हजारे ” सहित अनेक नगरसेवक उपस्थित……
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
महाराष्ट्राचे आराध्य दैवत , कुळवाडी भूषण ” छत्रपती शिवाजी महाराज ” यांची ३९६ वी जयंती गुरुवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी भिसेगाव प्रभागात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . यावेळी येथे असलेल्या छत्रपतींच्या अर्धाकृती स्मारकास रंग रंगोटी करून व रंगबेरंगी दिवे लावून परिसरात झगमगाट केला होता .
यावेळी ” छत्रपती शिवाजी महाराज ” यांच्या स्मारकास कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षा ” सौ पुष्पाताई हरिश्चंद्र दगडे ” यांनी पुष्पहार अर्पण करून त्यांच्या पराक्रमास ” अभिवादन ” केले , त्याचप्रमाणे उपनगराध्यक्ष संतोष दादा पाटील , बांधकाम सभापती महेंद्र चंदन , पाणी पुरवठा सभापती सुचिता खोत , भिसेगाव प्रभागाचे नगरसेवक विजय भाऊ हजारे , नगरसेविका सुमिता योगेश गायकवाड , नगरसेविका राधिका पवार , नगरसेवक अशोक दादा राऊत , नगरसेवक प्रशांत पाटील , नगरसेविका नेहा शिंदे , नगरसेवक राजाभाऊ कोठारी सर , आदी मान्यवरांनी देखील पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले .
याप्रसंगी कर्जत नगर परिषदेचे अधिकारी रविंद्र लाड , अविनाश पवार व इतर कर्मचारी तसेच भिसेगाव येथील शिवप्रेमी तरुण याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते . यावेळी छत्रपतींच्या ” जयघोषाने ” सर्वांनी ” मानाचा मुजरा ” केला .



