…..” कर्जत – पळसदरी रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य “…..
नागरिक , व्यावसायिक टाकतात " बेधडक " कचरा , " कारवाईची " मागणी !

” पुण्यनगरी – स्वामी समर्थ ” मठाकडे जाणाऱ्या ” पर्यटक व भाविकांत ” संतापजनक चर्चा…..
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत तालुक्यात दर दिवशी हजारोंच्या संख्येने ” फार्म हाऊस ” वर आनंद लुटण्यासाठी व मौज मजा करण्यासाठी ” पर्यटक ” व तर धार्मिक स्थळांना भेटी देऊन दर्शन घेण्यासाठी ” भक्त भाविक ” येत असतात , तर पुरातन स्थळे गड – किल्ले , बौद्ध लेणी असल्याने येथे संशोधन करण्यास देखील देश विदेशातून ” संशोधक , इतिहास तज्ञ ” येत असल्याने कर्जत तालुक्याला अनन्य साधारण महत्व देश पातळीवर आहे . ” स्वच्छ कर्जत – सुंदर कर्जत ” असा ” नारा ” येथे राजकीय दृष्ट्या देऊन करोडो रुपयांचा निधी खर्च करून येथील परिसर सुशोभित केला आहे . कर्जत शहराच्या याच प्रवेशद्वार अलीकडे कर्जत – पळसदरी रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून, बिन बोभाट अश्या कचरा टाकणाऱ्या नागरिक – व्यावसायिकांवर कारवाई कोण करणार ? अशी संताप जनक चर्चा होताना दिसत आहे .
कर्जत – पळसदरी रस्ता हा देखील ” पुण्यनगरी – पुण्यस्थान स्वामी समर्थ मठाकडे ” जाणारा रस्ता आहे . हा रस्ता भिसेगाव खिंडी नंतर पुढे सुरू होतो . या रस्त्यावर रस्त्याच्या बाजूला सध्या कचऱ्याचे साम्राज्य पुढे असलेल्या आदिवासी वाडी पर्यंत पसरले आहे . येथे नागरिक – व्यावसायिक कचरा आणून ” बेधडक ” टाकत असल्याने हा रस्ता ” गचाळ , दुर्गंधीयुक्त व बघण्यास घाणेरडा ” वाटत आहे. या रस्त्यावरून हजारो पर्यटक , भाविक भक्त श्री स्वामी समर्थ मठाकडे जात असतात , पायी दिंडीने वारकरी जात असतात . त्यामुळे इथे कचरा टाकणं योग्य नाही , अशी संतप्त चर्चा होत आहे .
या परिसरात जाणाऱ्या रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या जागेत सेवाभावी संस्था , मंडळांनी , राजकीय पक्षांनी , पक्ष पदाधिकारी यांनी , अथवा लोक सेवकांनी कुणाचा वाढदिवस असल्यावर ” स्वच्छता अभियान ” राबवून फुलांची झाडे , सुशोभित वृक्षारोपण , रस्त्याच्या दुतर्फा देखील आकर्षक फुलांची झाडे लावल्यास इथे कुणीही कचरा टाकणार नाही , व हा परिसर ” पर्यटनास व धार्मिक दृष्ट्या ” अनुकूल , सुशोभित , सुंदर दिसेल व कर्जतच्या पर्यटनाच्या इतिहासात एक सोनेरी पान या ” पुण्य नगरी – स्वामी समर्थ मठाकडे ” जाणाऱ्या रस्त्याचा असेल , यांत शंकाच नसेल .




