Uncategorized

…..” श्री कपालेश्वर मंदिरात महाशिवरात्र मोठ्या उत्साहात साजरी “……

जागृत देवस्थान असल्याने हजारो " शिव भक्तांनी " घेतले शिव दर्शन !

कर्जतमध्ये पाच दिवस चाललेल्या उत्सवात अनेक ” भाविकांची ” उपस्थिती…..

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

महाशिवरात्री हा भगवान ” शिव शंकराचा ” उत्सव. भोळ्या शंकराचे भक्त मोठ्या संख्येने असल्याने या सणाचे महत्त्व शहरापासून ग्रामीण भागापर्यंत , तर गरिबांपासून श्रीमंतापर्यंत आजच्या दिवशी श्री शंकराच्या पिंडी चे दर्शन घेण्यास व आमच्यावर सदैव तुझा ” आशीर्वाद ” राहू दे , अशी प्रार्थना करण्यास हजारो भक्त प्रत्येक मंदिरात पहाटे पासूनच दर्शन घेण्यास हजेरी लावतात . 

         कर्जत नगर परिषद हद्दीतील बाजारपेठेतील ” श्री कपालेश्वर मंदिर ” हे एक ” जागृत देवस्थान ” असून कर्जत तालुक्यातील व परिसरातील जनतेची तसेच भाविकांची या दैवतावर नितांत श्रद्धा आहे . या श्री कपालेश्वर मंदिरात बारा महिने पारंपारिक सण – उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येतात . नववर्षाचा गुढी पाडवा , श्री राम जन्मोत्सव , वटपूजन , आषाढी एकादशी साजरी करण्यात येते , नागपंचमी , श्री कृष्ण जन्माष्टमी उत्सव , श्रावणी सोमवार , हरितालिका पूजन , नऊ दिवस घट स्थापना नवरात्रौत्सव , विजयादशमीस सीमोलंघन , दिपावलीत दिव्यांची रोषणाई , या दरम्यान पौर्णिमेस काकड आरती व दिंडी , त्रिपुरारी पूजन , दीपोत्सव , एकादशीला हरिपाठ , श्री गणेश जन्मोत्सव , तर शिवरात्रोत्सवात कीर्तन , संगीत कार्यक्रम , असे विविध कार्यक्रम दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरे होतात . 

          यावर्षी देखील बुधवार दिनांक ११ फेब्रुवारी ते रविवार १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत कीर्तनकार हभप दिलीप विष्णू नामजोशी यांचे कीर्तन , द स्वर बरसात इव्हेंट प्रस्तुत ” सूर निरागस हो ” यांचा गाण्याचा संगीतमय कार्यक्रम , तर महाशिवरात्री दिनी पहाटे महादेव तुपे यांचे सनई वादन , श्री कपालेश्वराची रुद्राभिषेक पूजा आणि लघुरुद्र , सामूहिक शिवलीलामृत पारायण , सायंकाळी कर्जत शहरात श्री कपालेश्वरांची पालखी मिरवणूक , नंतर आरती व दिपकबुवा करोडे आणि प्रसादबुवा पाटील व सहकारी यांचे भजन असा भव्य सोहळा कार्यक्रमाचे आयोजन संपन्न झाले तर होणार आहे . 

       

यावेळी महाशिवरात्री दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ” कॉम्प – टेक कॉम्प्युटर एज्युकेशन ” कर्जत चे ” जितेंद्र माळी ” सरांकडून राजगिरा लाडू प्रसाद देण्यात आला . तर ” कर्जत माहेश्वरी समाजा ” तर्फे देखील फराळ वाटप करण्यात आले . याप्रसंगी श्री कपालेश्वर मंदिर व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष – महेंद्र बोडके , उपाध्यक्ष – अभिजीत मराठे , चिटणीस – प्रशांत कारूळकर , सह चिटणीस – विवेक भागवत , खजिनदार – संदीप भोईर , सभासद – पद्माकर गांगल , वनिता म्हसे , अंजली जोशी , लीलावती चंदन , शैलेश काळे , सदानंद जोशी , समीर सोहोनी , सुधाकर निमकर , आशिष गोखले , नितीन वाणी , सच्चिदानंद मिसाळ , मिलिंद तिवाटणे, आदी प्रत्येक कार्यक्रम साजरे करताना उपस्थित राहून मेहनत घेत असतात .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!