Uncategorized

…..” राजकीय क्षितिजावर झेप लोकसेवक ते नगरसेवक “…..

शिवसेनेच्या स्वीकृत नगरसेवक पदी " ॲड. रोहित राजेंद्र ओसवाल " यांची नियुक्ती !

कर्जतच्या ” व्यापारी ” वर्गाला दिलेला शब्द ” आमदार महेंद्र शेठ थोरवे ” यांनी पाळला…..

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

कर्जत नगर परिषद निवडणुकीत आपल्या ” महावीर पेठ ” या शिवसेनेच्या ” बालेकिल्ल्यात ” मित्र पक्षाला जागा वाटपात उमेदवारी गेल्याने याविरोधात बंड न करता पक्षादेश पाळून दिलेल्या उमेदवाराचे काम इमाने इतबारे करणारे शिवसेना कर्जत उपशहर प्रमुख ” रोहित ओसवाल ” यांना शिवसेनेकडून स्वीकृत नगरसेवक पद देण्यात आले . त्यांची नियुक्ती म्हणजे आमदार महेंद्र शेठ थोरवे यांची ” वचनपूर्ती ” असल्याचे सांगून कर्जतच्या व्यापारी वर्गाला दिलेला शब्द आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी पाळला असून नवनिर्वाचित नगरसेवक रोहित ओसवाल यांनी आमदार ” महेंद्र शेठ थोरवे ” व शिवसेनेचे युवा नेतृत्व तथा पालिकेतील विरोधी पक्ष नेते ॲड. ” संकेत भासे ” यांचे आभार व्यक्त केले .   

       कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या कार्यशैलीवर विश्वास टाकत ॲड. रोहित ओसवाल यांनी शिवसेना पक्षात काम करत अल्पावधीतच आपल्या महावीर पेठ प्रभागात अनेक समस्या सोडवत विकास कामे करून आपल्या कार्याची झलक सर्व प्रभागात उमटवली . स्वतः उच्चशिक्षित – वकील असल्याने त्यांनी आपल्या बुद्धिमतेच्या जोरावर ” लोकसेवक ते नगरसेवक ” असा प्रवास फार थोड्या दिवसांत केला . त्यांची ही राजकीय गरुड भरारी व केलेले कार्य , शिवसेना पक्षावर असलेली निष्ठा व आमदार महेंद्र शेठ थोरवे हे राजकीय गुरू व त्यांचा आदर यामुळे त्यांची झालेली स्वीकृत नगरसेवक पद म्हणजे फक्त आश्वासन नव्हे , तर बांधिलकी व केलेली वचनपूर्ती आज कर्जतमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे .

        आमदार महेंद्र शेठ थोरवे व नगरसेवक ॲड. संकेतजी भासे यांनी दिलेला शब्द गुरुवार दि. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी खऱ्या अर्थाने पाळला. व्यापारी वर्गाचा ” सन्मान ” राखत कर्जतमधील प्रख्यात दुकान मालक ” मंगलमूर्ती साडी विक्रेते ” व्यापारी ॲड . रोहित राजेंद्र ओसवाल यांची कर्जत नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी निवड हा तमाम व्यापारी ” एकतेचा ” आणि विश्वासाच्या विजयाचा क्षण असून शब्द पाळणारे नेतृत्व म्हणजे हेच खरे ” नेतृत्व ” असून कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे , पालिकेचे गटनेते ॲड संकेत भासे यांचे आभार व्यक्त करून माझ्या नगरसेवक पदाच्या कारकीर्दीत अधिक जोमाने लोकसेवा करेन , असे मत नगरसेवक ॲड. रोहित राजेंद्र ओसवाल यांनी व्यक्त केले . यावेळी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी नगराध्यक्षा सौ पुष्पाताई दगडे , मुख्याधिकारी तानाजी चव्हाण , शिवसेनेचे पदाधिकारी , सर्व नगरसेवक , मित्र परिवार , व्यापारी वर्ग , कुटुंबीय सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!