…..” कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील गंभीर समस्यांविरोधात बहुजन युथ पॅंथर आक्रमक “……
आठ दिवसांत समस्या न सोडविल्यास करणार तीव्र आंदोलन !

कोकण प्रदेश महिला अध्यक्षा ” पँथर अदिती रमेश ढोके ” यांचा प्रशासनाला संतप्त इशारा……
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत तालुक्यातील गोर गरिबांच्या आरोग्य सेवेसाठी असलेले उपजिल्हा रुग्णालयात अनेक गंभीर समस्या असून विशेष करून महिला भगिनींच्या होणाऱ्या कुचंबने विरोधात ” बहुजन युथ पँथर ” हि संघटना आक्रमक झाली असून प्रदेश कार्याध्यक्ष पँथर सुशील भाई जाधव यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या न्याय हक्कासाठी , सुख सुविधासाठी व कर्जत तालुक्यातील महिलांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी बहुजन युथ पँथरच्या कोकण प्रदेश महिला अध्यक्षा ” अदिती रमेश ढोके ” यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत या समस्यां विरोधात संतप्त आंदोलन छेडणार असल्याचा इशारा आरोग्य प्रशासनाला दिला आहे .

कर्जत शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालयाची भव्यदिव्य इमारत असून यांत अनेक समस्या आहेत . तालुक्यातून खेडोपाड्यातून येणाऱ्या महिलांना ज्या काही सुख सुविधा , सरकारी हॉस्पिटलमध्ये असतात त्या त्यांना वेळेवर मिळत नसतात . यामुळे महिलांची मोठ्या प्रमाणात गैरसोय निर्माण होत आहे . महिलांची होणारी गैरसोय बाबत बहुजन युथ पँथर ने पुढील मागण्या केल्या आहेत –
१) सोनोग्राफीसाठी येणाऱ्या महिलांना 8 तास बसावं लागते , त्यांची योग्य ती बसण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी .
२) महिलांसाठी स्वच्छ टॉयलेटची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी .
३) सोनोग्राफीसाठी ज्या महिला येतात त्यांच्यासाठी स्वच्छ फिल्टर केलेलं पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी .
४) सोनोग्राफीसाठी येणाऱ्या महिलांसाठी पंख्याची व्यवस्था किंवा कुलरची व्यवस्था करण्यात यावी .
५) जन्म दाखला काढण्यासाठी जे पालक येतात , त्यांना झेरॉक्स काढण्यास बाहेर पाठवले जाते , यामुळे त्यांना मानसिक त्रास होतो , म्हणूनच त्यासाठी कलर प्रिंट उपलब्ध करून देण्यात यावी .
अशा विविध मागण्यांसाठी बहुजन युथ पॅंथरने निवेदन दिले असून या निवेदनाची आपण दखल घेऊन येणाऱ्या आठ दिवसांमध्ये या सर्व मागण्या मान्य करून समस्या न सोडविल्यास आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने आपल्याविरुद्ध हॉस्पिटलच्या समोर संतप्त ” धरणे आंदोलन ” करू , असा इशारा पॅंथर आदिती रमेश ढोके – कोकण प्रदेश महिला आघाडी अध्यक्षा , यांनी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य प्रशासनाला दिला आहे .




