Uncategorized

कर्जत तालुक्यातील ऐतिहासिक ” आंबिवली बुद्ध लेणी ” येथे माघ पौर्णिमा उत्साहात साजरी !

" बुद्ध वंदना आणि कार्यशाळेसाठी " अनेक बौद्ध बांधव - महिला भगिनी उपस्थित.....

” कर्जत लेणी संवर्धन समिती ” चा पुढाकार…..

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

रविवार दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी, माघ पौर्णिमा निमित्ताने कर्जत तालुक्यातील ऐतिहासिक ” आंबिवली बुद्ध लेणी ” येथे ” कर्जत लेणी संवर्धन समिती ” ने पुढाकार घेत कर्जत मधील सर्व धम्म बांधवांना एकत्रित करून ” बुद्ध वंदना आणि कार्यशाळेचे ” आयोजन करण्यात आले होते . यावेळी मोठ्या संख्येने कर्जत तालुक्यातील बौद्ध बांधव व महिला भगिनी उपस्थित राहून सदर धम्म उपक्रम यशस्वी केला.

माघ पौर्णिमेच्या दिवशी, ” तथागत भगवान गौतम बुद्धांनी ” अर्हत सारिपुत्र आणि अर्हत महामोग्गलन यांना धम्माचे सेनापती म्हणून घोषित केले. त्यांनी भिक्खू संघाला विनय शिकवले. या दिवशी, त्यांच्या ८० व्या वर्षी, भगवान बुद्धांनी ” वैशाली ” नगरीत चपाल चैत्य येथे घोषणा केली की , ते तीन महिन्यांनी ” महापरिनिर्वाण ” प्राप्त करतील. याच दिवासाचे औचित्य साधुन कर्जत बौद्ध लेणी संवर्धक आणि कर्जत मधील सर्व धम्म बांधवांनी आंबिवली बुद्ध लेणी वर एक दिवसीय बुद्ध वंदनेचा कार्यक्रम व कार्यशाळा आयोजित केली होती. बुद्धवंदना कार्यक्रमासाठी आदरणीय ” भंते अधिचित्तो ” प्रामुख्याने उपस्थित होते.

यासोबतच लेणी विषयक माहिती व लेणीचा इतिहास कर्जत मधील लेणी संवर्धक जीतरत्न मनोहर जाधव , विकास सोपान धनवे आणि नरेश मधुकर जाधव यांनी उपस्थित उपासक आणि उपासकांना सांगितली.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुक्यातील अनेक धम्म बांधवांनी आर्थिक स्वरूपात दान केले तसेच रिपाई शहर अध्यक्ष ॲड. उदय अंकुश जाधव यांनी एसी बस ची मोफत व्यवस्था केली, रिपाई तालुका प्रसिद्धी प्रमुख विजय गायकवाड यांनी ५ किलो जिलेबी दान स्वरूपात दिली,तसेच राहुल सूर्यवंशी यांनी खीर दान केले.

कार्यक्रमाच्या शेवटी सचिन अभंगे सर यांनी आदरणीय भंतेजी अधिचित्तो यांचे विशेष आभार मानले व उपस्थित उपासक आणि उपसिकांचे आभार व्यक्त केले . तसेच यापुढे ही कर्जत तालुक्यात असेच प्रत्येक पौर्णिमेला बुद्ध लेणी वर बुद्ध वंदना व कार्यशाळेचे आयोजन व्हावे , अशी अपेक्षा व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!