Uncategorized

खोपोली ” मंगेश काळोखे ” यांच्या खुनाची ” १ कोटी ” रुपयांची सुपारी , ” आमदार महेंद्र शेठ थोरवे ” यांचा पत्रकार परिषदेत गौप्यस्फोट !

रायगड पोलिसांवर राजकीय दबाव , म्हणूनच शेवटचा आरोपी अजूनही मोकाट.....

लवकरच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची काळोखे कुटुंबियासहीत भेट घेणार……

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

खोपोली येथील ” मंगेश काळोखे ” खून प्रकरणी अनेक गौप्यस्फोट करण्यासाठी नुकतीच ” आमदार महेंद्र शेठ थोरवे ” यांनी सर्व काळोखे कुटुंबियासहीत आज पत्रकार परिषद घेतली . यावेळी त्यांनी मंगेश काळोखे यांच्या खुनाची सुपारी २० लाखांची नसून ” १ कोटी ” रुपयांची होती , ” रविंद्र देवकर व कॉन्ट्रॅक्ट किलर ” यांच्यात पोलीस कोठडीत भांडण झाल्याचे त्यांनी सांगितले.

शेवटचा आरोपी सुधाकर घारे यांना अटक न होता ते प्रचार करत फिरत असल्याने पोलिसांवर प्रचंड मोठा राजकीय दबाव येत असून कायद्याची पायमल्ली होत असल्याचे सांगून त्वरित पोलिसांनी त्यांना अटक करण्याची मागणी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी यावेळी केली.

मंगेश काळोखे यांच्या पत्नी मानसी काळोखे व त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळण्यासाठी लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना भेटून या खून प्रकरणी न्याय मागणार , हे देखील त्यांनी या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!