Uncategorized

…..” खबरदार जर कुणालाही स्वीकृत नगरसेवक पद द्याल तर “…..

कर्जत न. प. मध्ये परिवर्तन विकास आघाडी विजयी होण्यासाठी अनेक पक्षाचे प्रयत्न !

आश्वासनाची पूर्तता करा , कार्यकर्त्यांत संतप्त चर्चा……

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

कर्जत नगर परिषदेची आताची निवडणूक खूपच ” निकराची ” लढत झाली . हि निवडणूक ” भाजप ” प्रणित ” महायुतीच्या ” अस्तित्वाची लढाई होती . त्या विरोधात असलेल्या ” परिवर्तन विकास आघाडीला ” अनेक पक्षाने सहकार्य केले असल्याने त्यांच्या पाठीमागे अनेक ” ज्ञात – अज्ञात ” शक्तींचा पाठिंबा असल्यानेच भरघोस मताने परिवर्तन विकास आघाडीचा येथे ” विजय ” संपादन झाला . या अनेक पक्षांचे सहकार्य घेताना अनेक ” व्यूहरचना ” आखण्यात आली . मतांचे विभाजन न होण्यासाठी अनेकांना ” स्वीकृत नगरसेवक ” करू , असे आश्वासन परिवर्तन विकास आघाडीच्या नेत्यांनी दिले असल्याने आता सत्ता आल्यावर ” गरज सरो – वैद्य मरो ” अशी भूमिका घेऊन सहकार्य करणाऱ्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे ” केसाने ” गळा कापण्याचे काम आता परिवर्तन विकास आघाडी करत असल्याने ” खबरदार जर कुणालाही स्वीकृत नगरसेवक पद द्याल तर ” अशी भाषा आता हे सहकार्य करणारे पक्षाचे पदाधिकारी संतप्त होत बोलत असून ” विश्वास ” गमावण्याचे कार्य परिवर्तन विकास आघाडीचे नेते करत असल्याची जोरदार चर्चा कर्जतमध्ये होत आहे .

कर्जत परिवर्तन विकास आघाडीतील प्रमुख पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आहेत . यांची ” ताकद ” कर्जत नगर परिषदेवर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी कमीच पडत होती , म्हणूनच त्यांनी ” विषाची परीक्षा नको ” यासाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष , बहुजन समाज पार्टी , आझाद समाज पार्टी , शेकाप , काँग्रेस , भारतीय कम्युनिस्ट पक्ष , या पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून तुम्ही सहकार्य करा , तुम्हाला ” स्वीकृत नगरसेवक ” पद देतो , अशी बतावणी केली असल्यामुळेच या पक्षांनी परिवर्तन विकास आघाडीला सहकार्य केले . या त्यांच्या भूमिकेमुळे या पक्षाने उमेदवार दिले नाहीत व त्यामुळे मतांचे विभाजन न झाल्याने परिवर्तन विकास आघाडीची ” एकमुखी सत्ता ” कर्जत नगर परिषदेवर आली . थेट नगराध्यक्ष पद व १३ नगरसेवक निवडून आले .

मात्र आता ” स्वीकृत नगरसेवक ” पद देण्याची वेळ आली तशी माकडासारखी ” पलटी ” मारत या सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची कटू नीतीने ” केसाने गळा ” कापत ” विश्वासघात ” करत असून या पदाधिकाऱ्यांना आपल्या कार्यालयात ” खेटा ” मारायला लावत असून ” स्वीकृत नगरसेवक ” म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांची वर्णी लावणार असल्याची चर्चा आहे . यामुळे सहकार्य करणाऱ्या पक्षाचे पदाधिकारी संतप्त झाले आहेत . म्हणूनच उद्या २८ तारखेला गद्दारी होते की , ” उपकाराची ” परतफेड करून सहकार्य करणाऱ्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना ” बक्षीस ” देऊन ” सन्मान ” होतो , याकडे आता सर्वांचेच लक्ष लागून आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!