…..” कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला , जोरदार घोषणाबाजीत व विराट गर्दीत शिवसेनेचे जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अर्ज दाखल “……
कर्जत खालापूर मध्ये " राष्ट्रवादी व ठाकरे सेनेला " भुईसपाट करून " भगवा " फडकावणार !

कार्यसम्राट आमदार ” महेंद्र शेठ थोरवे ” यांचा एल्गार…..
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे . त्याच पार्श्वभूमीवर आज कर्जत मध्ये कार्यसम्राट आमदार ” महेंद्र शेठ थोरवे ” यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेच्या इच्छुक जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांनी विराट गर्दीत ” बाळासाहेब भवन ते प्रशासकीय भवन ” अशी भव्य रॅली काढून महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत जोरदार घोषणाबाजीत उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अधिकारी प्रकाश संकपाळ यांच्याकडे सादर केले .
आज मंगळवार दिनांक २० जानेवारी २०२६ रोजी शिवसेनेच्या सर्व उमेदवारांनी उमेदवारी अर्ज सादर केले . जिल्हा परिषदेच्या ६ तर पंचायत समितीच्या १२ उमेदवारांनी भव्य शक्ती प्रदर्शन केले . यावेळी या भव्य रॅलीत आमदार महेंद्र शेठ थोरवे , जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईर , उपजिल्हा प्रमुख भाई गायकर , राजिप चे माजी अध्यक्ष सुरेश दादा टोकरे , जिल्हा संघटक संभाजी जगताप , कर्जत तालुका प्रमुख सुदाम दादा पवाळी , संघटक शिवराम बदे , युवा जिल्हा प्रमुख प्रसाद थोरवे , कर्जत युवा सेना प्रमुख अमर मिसाळ , भास्कर दिसले , नगरसेवक संकेत भासे , जिल्हा संघटक अरुण देशमुख , गणेश मुंडे , गणेश पालकर , शिवाजी देशमुख , सौ. मीना ताई थोरवे – मा. पंचायत समिती सदस्या , त्याचप्रमाणे शिवसेना – युवा सेना – महिला आघाडीच्या पदाधिकारी , शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
यावेळी कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे म्हणाले की , कर्जत तालुक्यातील सर्व जागा शिवसेना ताकदीने लढणार आहे . अजून मित्र पक्ष भाजपा बरोबर बोलणी सुरू आहेत , उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी सर्व चित्र स्पष्ट होईल . यावेळी शेकाप , मनसे व इतर मित्र पक्ष देखील बरोबर असतील , यावर प्रकाश टाकत यावेळी मोठ्या ताकदीने आम्ही या निवडणुका लढवून दोन्ही तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व ठाकरे सेनेला ” हद्दपार व भुईसपाट ” करून ” भगवा फडकविणार ” , असा एल्गार आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी याप्रसंगी केला .
तर कर्जत तालुका युवा सेना प्रमुख अमर मिसाळ यांनी कर्जत तालुक्यात आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी केलेल्या विकास कार्याच्या जोरावर , व जनतेच्या पाठिंब्याने आम्ही सर्व जागेवर विजयी होऊ , असे मत व्यक्त केले .




