Uncategorized

” सदगुरु वामनराव पै ” शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था , कर्जत येथे ” राष्ट्रीय युवा दिन ” उत्साहात साजरा !

" राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद " यांच्या जयंती दिनी केले अभिवादन.....

” विकास दादा चित्ते ” प्रमुख पाहुणे उपस्थित…..

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

” सदगुरु वामनराव पै ” शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था , कर्जत येथे सोमवार दिनांक १२ जानेवारी ” राष्ट्रीय युवा दिन ” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . या दिवशी ” राजमाता जिजाऊ आऊसाहेब व स्वामी विवेकानंद ” यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून ” शिवशंभो युवा हायकर्स – कर्जत संस्थेचे अध्यक्ष, गिर्यारोहक विकास दादा चित्ते ” यांना आमंत्रित करण्यात आले होते. याप्रसंगी

राजमाता जिजाऊ आऊसाहेब , स्वामी विवेकानंद व सरस्वती माता यांचे प्रतिमेचे पूजन अनुक्रमे विकास चित्ते , प्राचार्य जी.बी. चौधरी सर व गवळी मॅडम यांचे हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रमुख वक्ते विकास दादा चित्ते यांनी आपल्या व्याख्यानात ” राजमाता जिजाऊ आऊसाहेब व स्वामी विवेकानंद ” यांचे जिवनावरील विचार मांडले. ” छत्रपती शिवाजी महाराज ” घराघरात जन्माला यायचे असेल , तर प्रथम घराघरात ” आऊसाहेब ” तयार होण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले. जिजाऊ आऊसाहेब यांनी केलेले ” संस्कार , शिकवलेले युद्ध कौशल्य व स्वराज्य स्थापनेचे स्वप्न ” याबाबत माहिती देऊन ” संस्कारक्षम पिढी ” निर्माण होण्याची आवश्यकता व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेले गड किल्ले आपल्या साठी ” प्रेरणादायी ” ठिकाणे असून यांचे ” संरक्षण , सेवा , इतिहासाची आठवण ” जिवंत ठेवणे , हे व्रत आजच्या युवा पिढीने केले पाहिजे , ही अपेक्षा व्यक्त केली , तर स्वामी विवेकानंद हे भारताचे महान संन्यासी , तत्त्वज्ञ व रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य असल्याचे नमूद केले . स्वामी विवेकानंद यांचे विचार मांडताना ” शिकागो ” येथील धर्म परिषद मध्ये भारताची दिलेली ओळख अत्यंत ” प्रेरणादायी ” असल्याचे सांगून ” उठा , जागे व्हा , आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका ” हा युवकांना दिलेल्या संदेशाची आठवण करुन दिली. देशासाठी , समाजासाठी आजच्या युवा पिढीने काम करावे , असे आवाहन त्यांनी केले. अनेक महापुरुषांनी आपल्या पुढे निर्माण केलेला इतिहास वाचणे, जिवंत ठेवणे ही काळाची गरज आहे , हे नमुद करुन सर्वांना ” राष्ट्रीय युवा दिनाच्या ” शुभेच्छा विकास दादा चित्ते यांनी दिल्या.

यावेळी गट निदेशक चौधरी सर यांनी आभार मानताना महापुरुषांनी दाखविलेल्या मार्गावर चालल्यास आपली ” प्रगती ” होईल व आजची युवा पिढी देव , देश आणी राष्ट्रासाठी उत्तम कार्य करील , हा विश्वास प्रगट केला.

या प्रसंगी ” सदगुरु वामनराव पै ” शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कर्जतचे शिक्षक वर्ग म्हात्रे सर , कदम सर , गवळी मॅडम , रजपुत मॅडम , कर्मचारी वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!