…..” एका पिढीकडून – दुसऱ्या पिढीकडे जीवनाची आरोग्यदायी सेवा “…..
नेरळमध्ये " डॉ. स्वप्नील दिनकर सरोदे व डॉ. श्रुती सरोदे " यांचे अत्याधुनिक उपचारांचे " सुदिन नर्सिंग होम "

” डॉ. दिनकर सरोदे ” यांच्या शुभहस्ते उद्घाटन संपन्न…..
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
आपला परिसर – गाव – शहर – तालुक्यातील नागरिकांचे आरोग्य सुस्थितीत राहण्यासाठी ” जीवनाची आरोग्यदायी सुरवात करणे आणि जीवन आरोग्यदायी बनवणे ” हा उदात्त हेतू मनाशी बाळगून गेली ४० वर्षे नेरळ शहरात वैद्यकीय सेवा देणारे ” डॉ. दिनकर सरोदे ” यांचे नाव लोकप्रिय असताना त्यांचे सुपुत्र डॉ. स्वप्नील दिनकर सरोदे ( MBBS, MD (Medicine) जनरल फिजिशियन मधुमेह व हृदयरोग तज्ञ व त्यांची पत्नी डॉ. श्रुती सरोदे ( MBBS DGO ) स्त्रीरोग व प्रसुति शास्त्र तज्ञ यांचे अत्याधुनिक पद्धतीचे उपचारांचे ” सुदिन नर्सिंग होम ” चे उद्घाटन रविवार दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वा. सुदिन बंगला, नेरळ – कर्जत हायवे, गजानन महाराज मंदिर जवळ, नेरळ, ता. कर्जत, जि. रायगड येथे शुभमुहूर्तावर डॉ. दिनकर सरोदे यांच्या हस्ते करण्यात आले .
डॉ. सरोदे यांचे ” सुदिन नर्सिंग होम ” मध्ये उपलब्ध सुविधात २५ बेडचे सुसज्ज नर्सिंग होम , २४ तास अत्यावश्यक सेवा , स्त्री रोग व प्रसुती विभाग असून सुसज्ज नर्सिंग होम , स्त्री रोग व प्रसुति विभाग , जनरल मेडिसिन विभाग , आय.सी यु. ऑपरेशन थिएटर स्पेशल रूम, स्त्री व पुरुष स्वतंत्र वार्ड गर्भाशय, अंडाशय आजारांवर उपचार व शस्त्रक्रिया , ICU, Pathology, फार्मसी , जनरल मेडिसिन विभाग , मधुमेह, हृदयरोग, रक्तदाब, मेंदूचे आजार , फुफ्फुस, मेदूचे निदान व उपचार करण्यात येणार आहेत .
या उद्घाटन प्रसंगी डॉ. दिलीप सरोदे – BE.PHD.IIT Bombay , डॉ. जयश्री भोळे – Retired medical officer , श्री. चंद्रकांत पाटील – Retired Msc bank employee , शिवसेना जिल्हा संघटक अरुण देशमुख , अनिल शंकर थोरवे – रिटायर्ड पोलीस निरीक्षक , पत्रकार संतोष पेरणे , राजेश ठाणगे आदी मान्यवर त्याचप्रमाणे कर्जत तालुक्यातील व नेरळ शहरातील अनेक राजकीय – सामाजिक व इतर सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी भेट दिली . तरी या अत्याधुनिक पद्धतीचे उपचारांचे इलाज करून आपले जीवन आरोग्यदायी ठेवा , असे आवाहन डॉ. स्वप्नील दिनकर सरोदे व डॉ. श्रुती सरोदे यांनी केले आहे .



