…..” ठाकरे शिवसेना गटनेते पदी ज्येष्ठ नगरसेवक ” संतोष दादा पाटील ” यांची नियुक्ती “…….
उपजिल्हा प्रमुख " नितीन दादा सावंत " यांनी केली घोषणा !

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत नगर परिषदेच्या निकालाची नुकतीच प्रतिक्षा संपली असून या निवडणुकीत परिवर्तन विकास आघाडीचे ” शिल्पकार ” शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख ” नितीन दादा सावंत ” यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला घवघवीत यश मिळाले असून ६ पैकी ५ जागेवर ” विजयी ” संपादन केला आहे . आज बुधवार दिनांक २४ डिसेंबर २०२५ रोजी संपर्क कार्यालय ” शिवालय ” येथे उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत यांनी निवडून आलेले ज्येष्ठ नगरसेवक ” संतोष दादा पाटील ” यांची कर्जत नगर परिषदेच्या ” गटनेते ” पदी नियुक्तीची घोषणा केली .
ठाकरे शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक ” संतोष दादा पाटील ” हे मुद्रे प्रभाग क्रमांक ३ ( ब ) येथून ९३६ मते मिळवून १२८ मतांची आघाडी घेत विजयी सलामी दिली . शिवसेनेचे खंदे समर्थक असलेले संतोष दादा पाटील हे ३ वेळा तर त्यांची पत्नी १ वेळा निवडून येत त्यांची यशस्वी राजकीय कार्यकिर्द आजपर्यंत आहे . जेष्ठ नगरसेवक संतोष पाटील यांनी सन २००९ , २०१४ , तर २०१९ मध्ये त्यांची पत्नी सौ. संचिता संतोष पाटील तर आता २०२५ मध्ये पुन्हा एकदा संतोष दादा पाटील यांनी विजयाची बाजी मारली आहे . ठाकरे शिवसेना पक्षाकडून त्यांचे नाव ” नगराध्यक्ष ” पदाचे उमेदवार म्हणून घोषित केले होते , मात्र नगराध्यक्ष महिला ओबीसी आरक्षण पडल्याने त्यांची हि संधी हुकली होती . या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची ” आघाडी ” होण्यासाठी त्यांनीच ” सुवर्णमध्य ” शोधला होता . या कर्जत परिवर्तन विकास आघाडीचे ते देखील ” शिल्पकार ” असल्याचे दिसून येत आहे . त्यामुळे ठाकरे शिवसेनेच्या या यशस्वी ” सेनापती ” ची निवड कर्जत नगर परिषदेच्या ” गटनेते ” पदी निवड करून आज सर्वानुमते उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत यांनी शिवालय येथे त्यांच्या नावाची घोषणा केली , व त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले .
याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत , कर्जत तालुका प्रमुख बाजीराव भाई दळवी, संपर्क प्रमुख भिवसेन दादा बडेकर , संघटक माधव कोळंबे , माजी सभापती पंढरीनाथ राऊत , महिला संघटिका करुणा बडेकर , शहरप्रमुख निलेश भाई घरत , नवनिर्वाचित नगरसेवक प्रशांत पाटील , नगरसेविका मानसी कानिटकर , नगरसेविका सुचिता खोत , महेंद्र कानिटकर व इतर शिवसैनिक उपस्थित होते . यावेळी सर्वांनी ” गटनेते संतोष दादा पाटील ” यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या .




