…..” पुष्पाताई हरिश्चंद्र दगडे यांनी ४४७० मतांची विजयी आघाडी घेत भाजप महायुतीच्या डॉ. स्वाती लाड यांचा केला पराभव “……
कर्जत नगर परिषदेवर " परिवर्तन विकास आघाडीचा " झेंडा फडकला !

” सुधाकर भाऊ घारे व नितीन दादा सावंत ” यांचे यशस्वी डावपेच…..
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत नगरपरिषद निवडणूक – २०२५ चा निकाल आज रविवार दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी अनपेक्षित व सर्वांनाच धक्का देत लागला . थेट नगराध्यक्ष पद हे ओबीसी महिला आरक्षित पडले असल्याने महायुतीच्या उमेदवार डॉ. सौ. स्वाती अक्षय लाड विरुद्ध परिवर्तन विकास आघाडीच्या सौ. पुष्पा हरिश्चंद्र दगडे यांच्यात खूपच चुरशीची लढाई झाली . अनेक आरोप प्रत्यारोपात झालेल्या या निवडणुकीत एकूण २१६८० मतदारांनी मतदान करून देशव्यापी कार्य केले . अखेर कर्जत परिवर्तन विकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – ठाकरे शिवसेना – स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यापूर्वी ३ वेळा नगरसेवक पद भूषविलेल्या अनुभवी सौ. पुष्पाताई हरिश्चंद्र दगडे यांना तब्बल १२९१६ मते मिळाली , तर महायुती भाजप – शिवसेना – आर पी आय पक्षाच्या डॉ. सौ. स्वाती अक्षय लाड यांना ८४४६ मते मिळाल्याने ” सौ. पुष्पाताई दगडे ” यांचा ४४७० इतक्या दमदार मतांची आघाडी घेत विजयी संपादन केला .
कर्जत नगर परिषदेचा निकाल पुढील प्रमाणे – प्रभाग १ (अ)- मयुरी गजमल – ८४४ , अरुणा वायकर – ११९७ विजयी उमेदवार – अरुणा वायकर, ३५३ (शिवसेना शिंदे गट) प्रभाग १ (ब) – किशोर कदम – ९५६ , सोमनाथ पालकर – ९४२ , जयदीप शिंदे – १६२ विजयी उमेदवार – किशोर कदम (शिवसेना शिंदे गट ) १४ मतांनी विजयी प्रभाग २ (अ) – कोयळ कन्हेरीकर – १३०६ , पूनम शिर्के – ६५६ , विजयी उमेदवार कोयल कान्हेरीकर , (शिवसेना शिंदे गट )६५० मतांनी विजयी. प्रभाग २ (ब) संकेत भासे – १४३९ ,नंदकुमार लाड – ५२७ , विजयी उमेदवार संकेत भासे (शिवसेना शिंदे गट ) ९१२ मतांनी विजयी , प्रभाग ३ (अ) – अंजली कडू – ११६७ , स्वामिनी मांजरे – ५५९ विजयी उमेदवार अंजली कडू (राष्ट्रवादी) ६०८ मतांनी विजयी , प्रभाग ३ (ब) – ज्ञानेश्वर कर्णूक – ८०८ , संतोष पाटी- ९३६ विजयी उमेदवार संतोष पाटील (शिवसेना ठाकरे गट )१२८ मतांनी विजयी , प्रभाग ४ (अ) – सुमिता गायकवाड – ११९४ , आम्रपाली डाळींबकर – ८३३ , विजयी उमेदवार सुमिता गायकवाड (राष्ट्रवादी) ३६१ मतांनी , प्रभाग ४ (ब) – सुनिल गोगटे – ४९६ , महेंद्र चंदन – १५६३ विजयी उमेदवार महेंद्र चंदन (राष्ट्रवादी) १०६७ मतांनी विजयी , प्रभाग ५ (अ) – राधिका पवार – ९३३४ , नेहा पेंदे – ७६१ विजयी उमेदवार राधिका पवार (राष्ट्रवादी) १७३ मतांनी विजयी , प्रभाग ५ (ब ) दिनेश ठोंबरे ८३६ , उमेश शेलार – ०९ , विजय हजारे ८६७ विजयी उमेदवार विजय हजारे (शिवसेना शिंदे गट ) ३१ मतांनी विजयी , प्रभाग ६ (अ) – सुवर्णा जोशी – १४७७ , सुचिता वांजळे – ६१४ विजयी उमेदवार सुवर्णा जोशी (शिवसेना ठाकरे गट )८६३ मतांनी विजयी , प्रभाग ६ (ब) – हृषीकेश जोशी – ६८९ , प्रशांत पाटील – १३९७ विजयी उमेदवार प्रशांत पाटील (अपक्ष ) ७०८ मतांनी विजयी , प्रभाग ७ (अ) – बिनिता घुमारे – ८१७ , वैभव सुरावकर – १२७६ विजयी उमेदवार वैभव सुरावकर (शिवसेना शिंदे गट ) ४५९ मतांनी विजयी , प्रभाग ७ (ब) – गौरी जोशी – ९७० , नेहा शिंदे – १०९२ विजयी उमेदवार नेहा शिंदे (राष्ट्रवादी) १२२ मतांनी विजयी , प्रभाग ८ (अ) – रामदास गायकवाड – १२०१ , सखाराम सोनावणे – १०९८ विजयी उमेदवार रामदास गायकवाड (भाजप ) १०३ मतांनी विजयी , प्रभाग ८ (ब) – सुचिता खोत – १३४४ , विशाखा जिनगरे – ९६८ विजयी उमेदवार सुचिता खोत ( शिवसेना ठाकरे गट )३७६ मतांनी विजयी , प्रभाग ९ (अ) – प्रकाश डेरवनकर – ७९९ , कुमेश मोरे – १४४१ ,राजेश साळुंके – २० , विजयी उमेदवार कुमेश मोरे (राष्ट्रवादी )६४२ मतांनी विजयी , प्रभाग ९ (ब) – जान्हवी देवघरे – १२५१ , चित्रा शितोळे – ९८४ विजयी उमेदवार जान्हवी देवघरे ( शिवसेना शिंदे गट )२६७ मतांनी विजयी , प्रभाग १० (अ) – हर्षाली गायकवाड – १७६२ , वैशाली मोरे – १३५० , विजयी उमेदवार हर्षाली उमेश गायकवाड (राष्ट्रवादी ) ४१२ मतांनी विजयी , प्रभाग – १० (ब) – नितेश बाचल – २४६ , कोमल म्हामुणकर – १३७८ , अशोक राऊत – १४७९ विजयी उमेदवार अशोक राऊत (राष्ट्रवादी ) १०१ मतांनी विजयी , प्रभाग १० (क) – मानसी कानिटकर – १५८० , रॉली पाल – १५२४ विजयी उमेदवार मानसी महेंद्र कानिटकर (शिवसेना ठाकरे गट ) ५६ मतांनी विजयी.
या अटीतटीच्या लढतीत परिवर्तन विकास आघाडीतील राष्ट्रवादी – ०८ , शिवसेना ठाकरे – ०४ ,अपक्ष – ०१ तर महायुतीतील शिवसेना शिंदे गट – ०७ , भाजप – ०१ असे पक्षीय बलाबल निवडून आले . कर्जत नगर परिषदेवर परिवर्तन विकास आघाडीचे नेते ” सुधाकर भाऊ घारे व नितीन दादा सावंत ” यांचे डावपेच यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे .



