Uncategorized

कर्जतमध्ये महामानव – भारतीय घटनेचे शिल्पकार ” डॉ बाबासाहेब आंबेडकर ” यांच्या ६९ व्या ” महापरिनिर्वाण ” दिनी त्यांच्या स्मृतीस अभिवादन !

सर्व क्षेत्रातील नागरिक झाले नतमस्तक.....

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

विश्व रत्न , भारतीय घटनेचे शिल्पकार ” डॉ बाबासाहेब आंबेडकर ” यांच्या ६ डिसेंबर २०२५ रोजी त्यांच्या ६९ व्या ” महापरिनिर्वाण ” दिनी अनेकांनी कर्जत येथे त्यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या विचारांना विनम्र ” अभिवादन ” केले . भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय घटनेच्या माध्यमातून या देशातील तमाम भारत वासियांना स्वातंत्र – समता – बंधुत्व – न्याय – व कायद्याच्या माध्यमातून संरक्षण दिले , म्हणूनच जगात ” भारतीय संविधान ” हि मजबूत आहे .

यावेळी कर्जत नगर परिषद हद्दीतील ” भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर ” चौकातील त्यांच्या अर्धाकृती स्मारकाला राजकीय – सामाजिक – शैक्षणिक – सांस्कृतिक – धार्मिक , क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी , नागरिकांनी , ज्येष्ठांनी , महिला वर्ग , तरुणांनी विश्व रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मेणबत्ती प्रज्वलित करून , पुष्पहार अर्पण करून सर्वांनी अभिवादन केले .

याप्रसंगी कर्जत नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष राजेश दादा लाड , स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम भाई जाधव , यांसह अनेक राजकीय व धार्मिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!