…..” कर्जत तालुक्यात तहसील कार्यालयात शासकीय कमिटीच नाहीत “……
" पालकमंत्रीच " नसल्याने कोण करणार नियुक्त्या , नागरिकांचा संतप्त सवाल !

राजकीय पक्षांचे ” रायगडात ” नक्की चाललय तरी काय ?
भिसेगाव- कर्जत / सुभाष सोनावणे –
महाआघाडी सरकार असताना तत्कालीन ” पालकमंत्री आदिती तटकरे ” यांच्या शिफारशीनुसार सन २०१९ च्या निवडणुकीनंतर घोषित केलेल्या कर्जत तालुक्यातील सर्व शासकीय कमिट्या सत्ता बदल होऊन बरखास्त झाल्यानंतर त्यानंतर आलेले शिंदे शिवसेना – भाजपा व आता झालेल्या निवडणुकीत विजयी झालेली भाजपा – शिवसेना – राष्ट्रवादी या सरकारची आलेली सत्ता असा आता पर्यंत एकूण ३ वर्षांचा कालावधी निघून गेला तरी अद्यापी ” पालकमंत्री ” पद निवड न झाल्याने त्याचा परिणाम शासकीय कामकाजावर होत आहे . म्हणूनच कर्जत तालुक्यात तहसील कार्यालयात ” जनतेच्या सेवेसाठी ” असलेल्या शासकीय कमिटीची निवड प्रलंबित आहे . त्यामुळे रायगडात राजकीय पक्षांचे नक्की काय चालले आहे ? असा संतप्त सवाल ” जनता ” करताना दिसत आहे .
कर्जत तालुक्यात तहसील कार्यालयाच्या अंतर्गत अनेक शासकीय कमिट्या येतात . या शासकीय कमिटी मध्ये कर्जत तालुका समन्वय समिती , संजय गांधी निराधार अनुदान योजना , तालुका राशन दुकान समिती , तालुका शांतता मोहल्ला समिती , त्याचप्रमाणे इतरही समिती येत असून या सर्व कमिटी रिक्त आहेत . या कमिटी वर सत्ताधारी असणाऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची वर्णी लागत असल्याने जनतेची कामे त्यामाध्यमातून होत असतात , व पक्षाच्या पदाधिकारी यांना सुद्धा काम करण्यास वाव मिळत असतो , मात्र जनतेला न्याय देणाऱ्या या कमिटी अस्तित्वात नसल्याने कर्जत तहसील कार्यालयात कामकाजावर देखील अंकुश दिसत नाही .
पालकमंत्री पदासाठी रायगडात ” शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस ” पक्षात जोरदार ” रस्सीखेच ” सुरू असल्याने या दोन पक्षाच्या भांडणात अद्याप पर्यंत ” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ” यांनी ” रायगडचा पालकमंत्री ” निवडला नाही . त्यामुळे पालकमंत्री नसल्याने या शासकीय कमिटी कोण नेमणार ? असा प्रश्न उपस्थित रहात असून नागरिकांच्या कामकाजावर त्याचा विपरीत परिणाम होत असून रायगडात नक्की चाललय तरी काय ? असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत .




