……” साधी गृहिणी – शिक्षिका – सामाजिक कार्य – राजकीय क्षेत्र ते वकील , एक संघर्षमय प्रवास “……
जागतिक महिला दिनानिमित्त " ॲड . सौ.पूजा सुर्वे " त्यांच्या कार्यास मानाचा मुजरा.......

” माता जिजाऊ , माता सावित्रीबाई ” यांचा वारसा…..मानाचा – सन्मानाचा…..
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
आपल्या शिक्षणाचा उपयोग सर्वांना करून आपल्या सोबतीला इतर महिलांना बरोबर घेऊन , ” माता जिजाऊ , माता सावित्रीबाई ” यांची शिकवण पुढे नेवून निराधारांना मार्ग दाखविणाऱ्या ” मार्गदात्या ” या जगात खूप कमी असतात . ” एक स्त्री शिकली तर संपुर्ण कुटुंब सुधारते ” , यासाठी महिलांना शिक्षणाचे महत्त्व व त्यांच्या ” सक्षमीकरणासाठी ” रोजगाराच्या माध्यमातून हजारो हातांना आपणही आधाराचा हात देणाऱ्या ” जिजाऊंची लेक ” आज कर्जत तालुक्यातील पळसदरी या ग्रामीण गावात राहून गोर गरीब कष्टकऱ्यांची ” माय ” बनून सातत्याने कार्य करत असताना एक चेहरा सर्वत्र दिसत आहे .” साधी गृहिणी – शिक्षिका – सामाजिक कार्य – राजकीय क्षेत्र ते वकील , असा एक संघर्षमय प्रवास ” करणाऱ्या ” ॲड. पूजा प्रताप सुर्वे ” यांचे अनमोल कार्याला आजच्या या जागतिक महिला दिनी ” मानाचा मुजरा ” करावासा वाटतो .
कॉलेज जीवनापासून सौ.पूजा सुर्वे महापुरुषांचे विचाराने प्रेरित होऊन ” रणरागिणी ” सारख्याच वागत . ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्यांनी प्रायव्हेट क्लासेस सुरू केले , क्लासेस घेत असतानाच त्यांनी उल्हासनगर येथे भारतीय हिंदी हायस्कूल मध्ये कॉम्प्युटर टीचर म्हणून नोकरी सुरू केली . एल आय सी मध्ये परीक्षा देऊन एजंट झाल्या , मात्र समाजसेवेचे व्रत घेतल्याने त्यांचे कुठेच मन रमत नव्हते म्हणून थोडी आर्थिक बाजू चांगली झाल्यानंतर खऱ्या अर्थाने त्या सामाजिक कार्यात उतरून महिलांच्या ” उन्नतीसाठी ” कार्य करण्याचे पाऊल उचलले .
त्यांनी ६ जून २०१८ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधत ” राजमाता जिजाऊ फाउंडेशनची ” स्थापना केली आणि या फाउंडेशनच्या मार्फत त्या झपाट्याने कामाला लागल्या . स्थापनेच्या दिवशीच मोफत दाखले वाटप शिबीराचे आयोजन केले . उत्पन्नाचे दाखले , पॅन कार्ड , आधार कार्ड ,जातीचे दाखले , रेशन कार्ड , डोमेसाईल इत्यादी विविध ५०० पेक्षा जास्त नागरिकांना व अशिक्षित तसेच आदिवासी महिलांना सर्व प्रकारचे दाखल्यांचे वाटप पळसदरी – कर्जत येथे केले . त्यानंतर २६ जून रोजी ” छत्रपती शाहू महाराज ” जयंती निमित्त पळसदरी ग्रामपंचायत हद्दीतील सर्व शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये खाऊ वाटपाचा कार्यक्रम घेतला , त्यात जवळजवळ साडेचारशे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केलं . ३० जुलै रोजी सर्व शाळांमध्ये गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप केल्या . गणेशोत्सवासाठी आरतीच्या पुस्तकांचे वाटप केले , त्यानंतर निराधार – अपंग – विधवा महिलांना संस्थे मार्फत पेन्शन योजना राबविली . पळसदरी ग्रामपंचायत मधील बेरोजगारांची नोंदणी ” जिजाऊ फाउंडेशन ” मार्फत करण्यात आली . फाउंडेशन मार्फत तीस महिला बचत गटांची स्थापना करून त्यांना कर्ज देऊन महिला ” सबलीकरण व आर्थिक मजबुतीसाठी ” प्रयत्न केले. ८ मार्च रोजी ” जागतिक महिला दिनानिमित्त ” एन डी स्टुडिओ बघण्यासाठी सर्व महिलांना घेऊन गेले. तसेच कागदी पिशव्या तयार करण्याचे प्रशिक्षण देऊन महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून स्वताच्या पायावर उभे राहण्यास सक्षम केले . सिंधुताई सपकाळ यांचा जाहीर कार्यक्रम घेऊन त्यांनी केलेल्या मोलाच्या मार्गदर्शनाने महिलांना भविष्यातील घडामोडीत त्याचा फायदा झाला . पळसदरी ठाकुरवाडी शाळेत मुलांना खेळाचे साहित्य वाटप केले तसेच पूरग्रस्तांसाठी बिस्किट वाटप केले, गोरगरिबांसाठी आरोग्य शिबीर घेतले व कौटुंबिक जीवनातुन मन मोकळे होण्यासाठी महिलांची विरंगुळा ” गड सहल ” किल्ल्यांवर घेवून जातात , जेणेकरून त्यांना छत्रपतींची ” प्रेरणा ” मिळावी .
कोरोना महामारीच्या काळात आदिवासी महिलांना अन्न धान्य व इतर सामानाचे वाटप केले. शिवजयंतीच्या निमित्ताने निबंध स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले , त्यात ५५० विद्यार्थ्यांनी ,तरुणींनी , महिलांनी भाग घेतला , छत्रपतींची प्रेरणा या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांना दिली . कला क्रीडा क्षेत्रात देखील ते खेळाडूंना प्रोत्साहित करतात . यासाठी अनेक क्रिकेट सामने ते भरवतात . असे एक ना अनेक प्रकारे जिजाऊ फाऊंडेशनने गोरगरीब आदिवासी महिला , नागरिकांसाठी दरवर्षी अनेक उपक्रम राबवले .” आपले सरकार ” हे कार्यालय उघडून गरीब – गरजू – अशिक्षित महिलांना सर्व प्रकारचे दाखले काढण्यास मदत करतात . महिलांच्या न्याय हक्कासाठी पोलीस ठाण्यात जाऊन झगडतात तर स्वतः ” वकील ” होऊन कायद्याच्या लढाईत त्यांची बाजू लढण्यासाठी महिला सक्षमीकरणात एक पाऊल पुढे टाकून या ” आधुनिक आणि तंत्रज्ञान ” युगात महिलांच्या ” मुकुटमणी ” झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे . मराठा आरक्षणाच्या लढाईत देखील त्यांचा सक्रिय सहभाग होता , तर वृक्षारोपण , आरोग्य शिबिर , रक्तदान शिबिर यासारख्या देशव्यापी कार्यात त्या हिरीरीने भाग घेतात . राजकीय क्षेत्रात देखील त्यांच्या कार्याचा आलेख उंचावणारा आहे . राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पूर्वी महिला जिल्हा उपाध्यक्ष तर आता कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्षा ,असा यशस्वी भरारी झेप घेतलेली पहाण्यास मिळते . कर्जत खालापूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत ” परिवर्तन विकास आघाडीला ” मिळालेल्या अभूतपूर्व यशात सौ. पूजा सुर्वे यांचा खारीचा वाटा आहे .
त्यांची महिलांसाठी असलेली तळमळ खरचं वाखाणण्याजोगी असून ” राजमाता जिजाऊं फाउंडेशनच्या ” माध्यमातून व राजकीय क्षेत्रात देखील कुटुंबातील जबाबदारी पार पाडून आपल्या आयुष्यातील ” सुवर्ण क्षण ” महिलांच्या उन्नतीसाठी खर्च करून सक्षम कार्य त्या करतात . शांत , सतत हसतमुख , असणाऱ्या पूजाजी , सर्व महिलांवर खूप प्रेम करतात , म्हणूनच त्यांच्या अडचणीत नेहमी धावून जातात , आणि या असंख्य महिलांचा परिवार , त्यांची शक्ती आहे . आजपर्यंत त्यांना त्यांच्या या कार्यामुळे लोकमत वृत्तपत्र समूह , अनेक संस्था , शाळा , धार्मिक स्थळे , राजकीय व्यासपीठावर सन्मानित करण्यात आले आहे . या सर्व घडामोडीत त्यांचे कुटुंब व त्यांचे पती ” श्री. प्रताप सुर्वे ” यांची साथ त्यांना कायम असते . रणरागिणी ॲड . सौ.पूजा सुर्वे यांच्या या ” अनमोल कार्यास ” ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त त्यांना मानाचा मुजरा !





