…. ” टोरेंटो वीज व धरण प्रकल्पाविरोधात प्रमुख विरोधी पक्ष ठाकरे शिवसेना गप्प का ? कर्जतमध्ये चर्चेला उधाण ! “……
पक्षाचे स्वतंत्र " आंदोलन " न केल्याने कर्जत तालुक्यातील बाधित नागरिकांना " न्याय " कोण देणार ?

हालिवलीच्या मा. सरपंच ” सौ प्रमिला सुरेश बोराडे ” यांच्या पुढाकाराने पक्ष प्रमुख ” उद्धव साहेब ठाकरे ” यांना निवेदन…….
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
सध्या होऊ घातलेल्या ” टोरंटो वीज व धरण प्रकल्पा ” विरोधात कर्जत तालुक्यात प्रकल्प बाधित व पर्यावरण प्रेमी नागरिकांनी ” रान ” उठवून जनजागृती करून आंदोलन उभे केले आहे . पर्यावरण प्रेमी असलेल्या नागरिकांनी या विरोधात साखळी उपोषणाचा देखील मार्ग पत्करला असताना राज्यात व या मतदार संघात प्रमुख विरोधी पक्ष असलेला कर्जत तालुक्यातील ” शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ” पक्ष याविरोधात ” दंड थोपटून ” उभे राहिल्याचे चित्र येथे पहाण्यास मिळाले नसून त्यांचे पदाधिकारी व पक्ष नेते ” साइड कॉर्नर ” घेऊन इतरांच्या आंदोलनात सामील होताना दिसले . पक्षाचा कुठलाही स्वतंत्र संतप्त आंदोलनाचा ” अजेंठा ” दिसत नसल्याने याविषयी ” चर्चेला उधाण ” आल्याचे चित्र दिसत आहे . मात्र याविरोधात हालिवली ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौ. प्रमिला सुरेश बोराडे व कर्जत तालुका महिला आघाडी यांनी बाधितांना न्याय देण्यासाठी व पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी तसेच या प्रकल्पांचा स्थानिक भूमिपुत्रांना व नागरिकांना काहीच फायदा नसल्याने याची तक्रार थेट ठाकरे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे शिवसेना भवन मुंबई येथून आलेल्या रायगड जिल्हा निरीक्षक वेदिकाताई कांबळे व नागपूर संपर्कप्रमुख मंदाकिनी भावे या जनसंपर्क कार्यालय कर्जत ” शिवालय ” येथे आल्या असता , यावेळी त्यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे .

राज्याबरोबरच , कर्जत खालापूर मतदार संघात भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेवर आहे , तर प्रमुख विरोधी पक्ष म्हणून ” ठाकरे शिवसेना ” असताना नागरिकांना डोईजड ठरणाऱ्या व पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या या टोरेंटो वीज व धरण प्रकल्पा विरोधात ठाकरे शिवसेना रस्त्यावर उतरलेली दिसली नाही . प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका स्वतंत्रपणे आंदोलन करून मांडणे गरजेचे असताना पर्यावरण प्रेमींनी केलेल्या आंदोलनात ” साइड कॉर्नर ” ची भूमिका , घेऊन त्यात सामील झाले , मात्र आपली स्वतंत्र संतप्त भावना दाखवली नाही .या प्रकल्पाविरोधात ” दंड थोपटून ” उभे राहण्याची गरज होती . त्यांच्या या भूमिकेमुळे प्रकल्पग्रस्त नागरिकांना न्याय कोण देणार ? असा संतप्त सवाल आता जनमानसात उमटू लागला होता . याबाबतीत वरिष्ठ नेत्यांकडून देखील कुठलीच हालचाल व आदेश येत नसल्याने नक्की ठाकरे शिवसेनेची भूमिका काय ? हे समजू शकली नव्हती.
ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक देखील बघ्याची भूमिका घेत असताना याविरोधात आपल्या नेत्यांच्या कानावर हि गंभीर बाब घालून आपला ” स्वतंत्र लढा व स्वतंत्र रस्त्यावरचे आंदोलन ” छेडण्याची गरज असल्याचे गाऱ्हाणे देखील कुणीच कसे मांडत नाहीत , हा देखील यक्षप्रश्न निर्माण झाला असताना , नुकताच कर्जत तालुका महिला आघाडीने ही गंभीर बाब लक्षात घेऊन उपजिल्हाप्रमुख नितीन दादा सावंत, कर्जत तालुकाप्रमुख बाजीराव दळवी, यांना हालिवली ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौ प्रमिला सुरेश बोराडे यांनी सांगून हे निवेदन शिवसेना भवन मुंबई येथून रायगड जिल्हा निरीक्षक वेदिकाताई कांबळे व नागपूर संपर्कप्रमुख मंदाकिनी भावे यांना ” शिवालय ” या कार्यालयात देण्यात आले.
यावेळी हे निवेदन देताना तालुकाप्रमुख करुणा बडेकर , उपसभापती चित्रा ठाकरे , हालिवली मा. सरपंच सौ. प्रमिला बोराडे, उपतालुकाप्रमुख संगिता खडे , मनिषा म्हसे – पाथरज विभाग प्रमुख , अर्चना म्हसे – युवती सेनाप्रमुख उमरोली विभाग , योगिता कोळंबे – संपर्कप्रमुख , सारिका मानकामे – कळंब विभाग प्रमुख , नीता मांडे – मुद्रे विभाग प्रमुख आदी ठाकरे शिवसेनेच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या. यावेळी अर्ध्या कर्जत तालुक्यातील गावांमधून टोरेंटो वीज प्रकल्पाचे टॉवर बसविणार असल्याने अनेकांच्या जागा बाधित होणार असल्याने , ठाकरे शिवसेना प्रखर आंदोलन करून बाधित शेतकऱ्यांच्या जमिनी देखील वाचवणार असल्याने या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हा , असे आवाहन करत मध्यप्रदेश मध्ये ” पर्यावरणाची रक्षा ” करण्यासाठी महिलांनी केलेल्या ” चिपको ” आंदोलनासारखे प्रखर आंदोलन आम्ही करून झाडांचे संरक्षण करू , असे मत हालिवली ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच ” सौ प्रमिला सुरेश बोराडे ” यांनी व्यक्त केले .

यावर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख ” उद्धव साहेब ठाकरे ” काय भूमिका घेतात ? याकडे कर्जत तालुक्यातील ठाकरे शिवसेनेचे तसेच सर्वांचेच लक्ष लागून आहे .




