…..” विजेची तार तुटल्याने आर पी आय कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड यांच्या प्रसंगावधनाने किरवली येथे जीवघेणा अनर्थ टळला “….
लोडिंग गाडीने विजेची तार तोडूनही किरवली येथील तरुणाची दादागिरी !

कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल….
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या किरवली गावात वीज कंपनीची जिवंत वीज वाहिनी गावातीलच एक तरुण संकेत बडेकर जड चार चाकी लोड असलेली गाडी घेऊन गावातून जात असताना तुटली . मात्र ऐनवेळी किरवली ग्रामपंचायतीचे माजी सदस्य तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कर्जत तालुका अध्यक्ष ” हिरामण भाई गायकवाड ” यांनी प्रसंगावधान दाखवून ग्रामस्थांचे ” विजेचा शॉक ” लागण्यापासून वाचवले .
याबाबतीत गौरव हिरामण गायकवाड यांनी कर्जत पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार शुक्रवार दिनांक १२ जून २०२६ रोजी किरवली गावात दुपारी १.०० वाजण्याच्या सुमारास गावातीलच ग्रामस्थ संकेत वसंत बडेकर हे आपली लोड असलेली चार चाकी ट्रक गाडी क्र. MH 43 CK 3811 घेऊन गावातील रस्त्याने जात असता या गाडीने गावातील लाईटची जिवंत विजेची तार तोडली.

गाडीने तार तुटेल हे सांगूनही बडेकर ऐकत नव्हते . तार तुटली तेंव्हा गावातील तीन तरुण तिथे उभे असता त्यांच्या अंगावर हि जिवंत विजेची तार स्पर्श केली असती तर नाहक जीवितहानी झाली असती. मात्र प्रसंगावधान बघून आर पी आय कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड यांनी तिथे उभे राहून तब्बल सहा तासाने गावातील वीज प्रवाह पूर्ववत करून घेतला . त्यामुळे आर पी आय कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड यांच्यामुळे पुढील गंभीर घटना टळली .
याबाबत ग्रामस्थांना काय कमी जास्त झाले असते , जीवितहानी झाली असती तर त्याला जबाबदार कोण ? असे गौरव गायकवाड यांनी संकेत बडेकर यांना म्हटल्यावर , जा माझी पोलीस ठाण्यात तक्रार कर , असे बेजबाबदारीचे उत्तर त्यांनी दिले . व तक्रारदार यांना शिवीगाळी करुन माझी गाडी नाही सोडली तर तुला बघुन घेतो , अशी धमकी दिली , म्हणून कर्जत पोलीस ठाणे अदखलपात्र गुन्हा रजि नंबर 556/2026 BNS 2023 चे कलम 351(2), 352 प्रमाणे तक्रार नोंदवली आहे . याबाबत पुढील तपास कर्जत वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार काटे करत आहेत.

किरवली गावात अनेक संघर्षानंतर खराब झालेला रस्ता नुकताच दुरुस्त करून सिमेंट काँक्रीटचा झालेला आहे. अश्या गावातील अंतर्गत रस्त्यावर जड वाहनांना बंदी असताना अश्या गाड्या घेऊन जाणे , हे बेकायदेशीर आहे . त्यातच अती उंच गाडीमुळे विजेची तार तुटून जीवितहानी झाली असती तर म्हणूनच विरोधक यांनी ग्रामस्थ म्हणून काळजी घेणे गरजेचे असल्याचे बोलले जात असून मात्र आर पी आय कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड यांच्या वेळीच घेतलेल्या प्रसंगावधनाणे पुढील जीवितहानी होण्याचा प्रसंग टळला आहे .




