…..” कर्जत मध्ये संयुक्त जयंती निमित्त राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी “…..
कर्जत नगर परिषदेचे " नगराध्यक्ष - उप नगराध्यक्ष व नगरसेवकांचा " केला सन्मान !

मा. उपनगराध्यक्ष ” राहुलजी डाळींबकर ” यांच्या पुढाकाराने व ” राहुल युवक मंडळ – यशोधरा महिला मंडळ ” यांचे सहकार्य……
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत शहरातील नावाजलेले ” राहुल युवक मंडळाचे ” संस्थापक अध्यक्ष मा. उपनगराध्यक्ष तथा आर पी आय पक्षाचे कोकण प्रदेश कार्याध्यक्ष ” राहुलजी डाळींबकर यांच्या पुढाकाराने व यशोधरा महिला मंडळ यांच्या सहकार्याने ” छत्रपती शिवाजी महाराज – विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर – महात्मा ज्योतिबा फुले – छत्रपती शाहू महाराज ” यां महापुरुषांची संयुक्त जयंती महोत्सव रविवार दिनांक १२ एप्रिल २०२६ पासून संध्याकाळी ७.०० वाजता विश्व रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक – कर्जत येथे मोठ्या उत्साहाने सुरुवात झाली . यानिमित्ताने कर्जत येथे भव्य प्रबोधन कार्यक्रम आणि भीम गीतांचा ऑर्केस्ट्रा , तर आलेल्या कर्जत नगर परिषदेच्या थेट नगराध्यक्षा , उप नगराध्यक्ष , नगरसेवक , नगरसेविका या मान्यवरांचा राहुल युवक मंडळ व यशोधरा महिला मंडळाच्या वतीने शाल , पुष्पगुच्छ , सन्मान चिन्ह देऊन सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला . या अगोदर मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले .

यावेळी विचार पिठावर नगराध्यक्षा सौ. पुष्पा ताई दगडे , उप नगराध्यक्ष संतोष दादा पाटील , गट नेते तथा बांधकाम सभापती महेंद्र चंदन पाटील , नगरसेविका अरुणा वायकर , नगरसेविका जान्हवी देवघरे , नगरसेवक बाबू पाटील , माजी नगरसेविका सौ. मधुरा चंदन पाटील , राहुल युवक मंडळाचे आधारस्तंभ तथा माजी उप नगराध्यक्ष राहुल डाळींबकर , नरेंद्र गायकवाड , इतिहास संशोधक वसंत कोळंबे साहेब , भारतीय बौद्ध महासभेचे कर्जत ता. अध्यक्ष बी.एच. गायकवाड , इरेश्वर गायकवाड , बौद्धचार्य मनोहर ढोले , बौद्धचार्य आप्पा साळवे , बौद्धचार्य गमरे , बौद्धाचार्य गायकवाड , बागुल सर , खैरे , जाधव सर , भरत सोनावणे , राहुल युवक मंडळाचे अध्यक्ष सिद्धांत डाळींबकर , उपाध्यक्ष वैभव कांबळे , अजय डाळींबकर सर , निलेश डोळस , सुरेश जाधव , आदी मान्यवर उपस्थित होते .

याप्रसंगी नगराध्यक्ष सौ. पुष्पा ताई हरिश्चंद्र दगडे यांनी महापुरुषांच्या या जयंतीच्या निमित्ताने सर्व कर्जतकर नागरिकांना शुभेच्छा दिल्या , तर उपनगराध्यक्ष संतोष दादा पाटील यांनी ज्या विश्वासाने कर्जतकर नागरिकांनी आम्हाला निवडून दिले आहे , त्या विश्वासाने सर्वांच्या समस्या पाणी , आरोग्य , वाहतुकीचा प्रश्न व इतर समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणार , हे सांगून त्यांनी ही सर्वांना शुभेच्छा दिल्या , तर बांधकाम सभापती महेंद्र चंदन पाटील यांनी आम्हाला निवडून देऊन जी संधी दिले त्याचे सोने करणार , व त्यांनी ही जयंतीच्या शुभेच्छा दिल्या . नगरसेवक बाबू पाटील यांनी देखील शुभेच्छा दिल्या तर नगरसेविका जान्हवी देवघरे यांनी कर्जतकरांनी ज्या विश्वासाने आम्हाला नगर पालिकेत बसविले आहे , त्याला तडा जाऊ देणार नाही , असा विश्वास व्यक्त करत सर्वांना भीम जयंतीच्या शुभेच्छा दिल्या . नगरसेविका अरुणा वायकर यांनी देखील सर्वांना शुभेच्छा दिल्या , माजी नगरसेविका मधुरा चंदन पाटील यांनी गेल्या पाच वर्षात आम्ही अनेक कामे करून समस्या सोडवल्या , यापुढे ही काम करून दाखवणार , अशी हमी दिली . यावेळी ” सौरभ भगवान जाधव ” या विद्यार्थ्याने सी ए परीक्षा पास केली म्हणून मान्यवरांच्या शुभ हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला . याप्रसंगी कु. समता विजय देशपांडे या विद्यार्थिनीने मनोगत व्यक्त करत बाबासाहेबांचा इतिहास व सर्वांगीण कार्य व्यक्त केले .

यावेळी इतिहास संशोधक वसंत कोळंबे सर यांनी प्रबोधन सत्रात सांगितले की , या देशात महापुरुषांच्या जन्मा अगोदर २ हजार वर्षे ” विषमता वादी ” व्यवस्था होती , समाज रचनेवर या व्यवस्थेचा अंकुश होता , दंड , इतर कठोर शिक्षा यांत होत्या , महिलांना देखील कठोर शिक्षा होत्या , लग्न होऊन नवरा २ दिवसांत जरी मरण पावला तरी त्या स्त्री ने सती जायचं , अशीच व्यवस्था छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात देखील होती , म्हणून त्यांनी या व्यवस्थे विरोधात लढा दिला , पुनर्विवाहाला विरोध होता , नंतर पाट लावण्याचं प्रथा होती , विधवेला जर मूल झालं तर ते विहिरीत टाकायचं अशी प्रथा फुलेंच्या वेळी होती , विधवेला जर मूल झाले तर जन्मठेप ची सजा होती , या विरोधात महात्मा ज्योतिराव फुले यांनी प्रखर लढा देत शिक्षणाचे धडे महिलांना दिले . डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील महिलांना अधिकार मिळण्यासाठी खूप संघर्ष केला , १९२७ ला महाड येथे केलेल्या पाण्याचा संघर्ष व मुंबई येथे ” कामाठीपुरा ” येथे माहिती देताना हा व्यवसाय सोडून देण्याचे सांगितले , याने महिलांचे नाव खराब होत आहे , यावर सर्व १ हजार महिलांनी तो व्यवसाय सोडून दिला , यावर प्रकाश टाकला . महापुरुषांचे इतिहास सांगत इतिहास संशोधक वसंत कोळंबे साहेब यांनी खूप छान प्रबोधन केले . यानंतर भीम गीतांचा ऑर्केस्ट्रा झाला , यावेळी मोठ्या संख्येने बौद्ध बांधव , महिला वर्ग व कर्जतकर नागरिक उपस्थित होते . यावेळी या कार्यक्रमाचे सुमधुर व कौशल्य युक्त सूत्र संचालन सतिश देशपांडे यांनी केले , तर त्रिसरण पंचशील – बुद्ध वंदना अखिल भारतीय बौद्धमहासंघ बोद्धाचार्य – गौतम गमरे , चंद्रकात आप्पा साळवे , मालु गायकवाड सर , मनोहर ढोले यांनी केले .





