Uncategorized

……” कर्जत – डिकसळ येथे भीम जयंती निमित्त रक्तदान शिबिर संपन्न “……

" शांतीदूत मंडळ, माता रमाबाई महिला मंडळ " , शांतीनगर, डिकसळ यांचा स्तुत्य उपक्रम !

रक्तदान करून अनेकांनी केले ” देशव्यापी ” कार्य व विश्व रत्न ” डॉ. बाबासाहेब आंबेडकर ” यांना अभिवादन……

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

कर्जत तालुक्यात डिकसळ येथे भारतीय राज्यघटनेने शिल्पकार , महामानव भारतरत्न ” डॉ. बाबासाहेब आंबेडकर ” यांच्या १३५ व्या जयंती निमित्त ” शांतीदूत मंडळ, माता रमाबाई महिला मंडळ ” , शांतीनगर, डिकसळ येथे कर्जत – खालापुर तालुक्यातील ५३८ वे भव्य रक्तदान शिबिर रविवार दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी एकूण ४८ रक्तदात्यांनी रक्तदान करुन राष्ट्रीय – सामाजिक – मानवतावादी कार्य केले .

           या रक्तदान शिबिराचे उदघाटन शांतीदूत मंडळाचे विद्यमान अध्यक्ष – ” नितीन भाऊ गायकवाड , सचिव – विजय पवार, खजिनदार – विक्रांत ब्राह्मणे ” यांच्या शुभ हस्ते झाले. या रक्तदान शिबिरात कर्जत नगर परिषदेच्या विद्यमान थेट नगराध्यक्षा सौ.पुष्पाताई दगडे , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या कर्जत तालुका महिला अध्यक्षा ॲड. रंजना धुळे , रायगड जिल्हा परिषद सदस्य सौ. सुवर्णा ठाकरे , कर्जत पंचायत समिती सदस्य सौ. नमिता श्रीखंडे , लहुजी श्रीखंडे , ज्येष्ठ पत्रकार संतोष पेरणे , रायगड भूषण किशोर गायकवाड , ॲड. उत्तम गायकवाड , महिला मंडळ अध्यक्षा अर्चना गायकवाड , उपाध्यक्ष भारती भोईर , रेखा गायकवाड , संगीता गायकवाड , श्वेता गायकवाड , दीक्षा हिरे , शांतीदूत मंडळाचे माजी खजिनदार उमेश गायकवाड , सागर ब्राह्मणे , माजी अध्यक्ष समीर गायकवाड , प्रमोद चव्हाण , प्रमोद वाघमारे , रत्नदीप हिरे , सुजल हिरे , प्रशिक गायकवाड , निखिल गायकवाड , प्रणव गायकवाड , अविनाश चव्हाण , सौरभ वाघमारे , यश गायकवाड , आशुतोष सोनावणे ,आयुष दिवाकर , अतिशय गायकवाड , मनोज गायकवाड , समाधान गायकवाड , हर्षवर्धन , अमिर मणियार , सुरेश सुर्वे , आदींसह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहुन सर्व रक्तदात्यांचे मनोधैर्य वाढविले .

         याप्रसंगी रक्त संकलनाचे काम घाटकोपर येथील ” समर्पण रक्त केंद्राचे ” डॉक्टर , टेक्निशियन , व इतर रक्तसेवकांनी उत्तम पद्धतीने केले .

         हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी ” शांतीदूत मंडळ व रमाबाई महिला मंडळाच्या ” सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले . या देशव्यापी कार्यात सहभागी झालेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार शांतीदूत मंडळ , रमाबाई महिला मंडळ – शांतीनगर डिकसळ व राजाभाऊ कोठारी – ” रायगड भूषण – महारक्तवीर – सार्वजनिक रक्तदाता – नगरसेवक ” यांनी व्यक्त केले. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!