……” कर्जतमध्ये ” डॉ. बाबासाहेब आंबेडकर ” यांच्या १३५ व्या जयंती महोत्सवाला १२ एप्रिल पासून सुरुवात “…….
" डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक कर्जत " येथे भव्य " प्रबोधन कार्यक्रम " आणि " भीम गीतांचा " ऑर्केस्ट्रा !

कर्जतकरांचे ” राहुल युवक मंडळ व यशोधरा महिला मंडळाचा ” पुढाकार……
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत शहरातील नावाजलेले ” राहुल युवक मंडळाचे ” संस्थापक अध्यक्ष मा. उपनगराध्यक्ष तथा आर पी आय पक्षाचे कोकण प्रदेश कार्याध्यक्ष ” राहुलजी डाळींबकर यांच्या पुढाकाराने व यशोधरा महिला मंडळ यांच्या सहकार्याने ” छत्रपती शिवाजी महाराज – विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर – महात्मा ज्योतिबा फुले – छत्रपती शाहू महाराज ” यांची संयुक्त जयंती महोत्सव रविवार दिनांक १२ एप्रिल २०२६ पासून ते १४ एप्रिल पर्यंत विश्व रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक – कर्जत येथे मोठ्या उत्साहाने सुरुवात होऊन साजरी होणार आहे . यानिमित्ताने कर्जत येथे भव्य प्रबोधन कार्यक्रम आणि भीम गीतांचा ऑर्केस्ट्रा ,भव्य मिरवणूक , भोजन दान असे विविध कार्यक्रम होणार आहेत .
रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी ” डॉ. बाबासाहेब आबेडकर जयंती महोत्सव ” कर्जतकरांचे आणि आपल्या गावाचे राहुल युवक मंडळ, यशोधरा महिला मंडळ व सर्वांच्या सहकार्यातून साजरा होत असल्याने या जयंतीकडे सर्वांचेच लक्ष लागून असते . यावेळी रविवार दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६:३० वाजता त्रिसरण पंचशील – बुद्ध वंदना अखिल भारतीय बौद्धमहासंघ बोद्धाचार्य – गौतम गमरे , चंद्रकात आप्पा साळवे , मालु गायकवाड सर हे घेणार असून व यानंतर ” गुणवंतांचा सत्कार सोहळा ” आयोजित करण्यात आला आहे , तर सायंकाळी ७.०० वा. ” राष्ट्रपिता ज्योतीराव फुले ” जयंती निमित्त प्रबोधन कार्यक्रम , व्याख्याते मा. वसंतजी कोळंबे साहेब ( इतिहास संशोधक, संविधानाचे अभ्यासक कर्जत ) यांचे ” छत्रपती शिवराय , राष्ट्रपिता ज्योतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ” या महापुरुषांचा समतेसाठी केलेला संघर्ष , या विषयावर प्रबोधन कार्यक्रम होणार आहे . रात्री ९.०० वाजता पंकज राजाराम जाधव प्रस्तुत ” अभिवादन महामानवाला ” तथागत भगवान गौतम बुद्ध – भिम गीते आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गीतांचा अनोखा नजराणा असा ” भिमगीतांचा ऑर्केस्ट्रा ” होणार असून संगीत संयोजक – पंकज राजाराम जाधव , गायक – तेजस महाडिक , गायिका – भार्गवी बांदकर/गावडे असे ख्यातनाम गायक आहेत.
तर मंगळवार दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११.०० वा. बुद्ध विहार, बुद्ध नगर कर्जत, येथे पूजा पाठ , त्रिसरण पंचशील , बुद्ध वंदना , सकाळी ११.३० वा. विश्व रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रमुख वक्त्यांचे मार्गदर्शन तर सायं. ५.०० वा.भव्य मिरवणूक व महापुरुषांच्या प्रतिमाचे पूजन होणार आहे .

विश्व रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एकच असा ” संयुक्त जयंती महोत्सव ” कर्जत शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व समाजाच्या सहमतीने होत आहे , तरी तालुक्यातील सर्व बौद्ध बांधव – महिला भगिनी , बहुजन वर्ग , व तमाम कर्जतकर नागरिकांनी सहकुटुंब – सहपरिवार या महापुरुषांच्या जयंती महोत्सवास उपस्थित राहून आपला ” आनंदोत्सव साजरा करावा , असे आवाहन कर्जतकरांचे राहुल युवक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा. राहुलजी डाळिंबकर – मा. उपनगराध्यक्ष क.न.प., कोकण प्रदेश कार्याध्यक्ष आरपीआय कर्जत , संस्थापक अध्यक्ष – मा. विजयजी डाळिंबकर , राहुल युवक मंडळ संस्थापक अध्यक्ष मा. ईरेश्वर गायकवाड – उद्योगपती , स्वागत अध्यक्ष – मा. दिपकजी भालेराव सामाजिक कार्यकर्ते, बैंक मॅनेजर , मा. जगनजी काकडे – सामाजिक कार्यकर्ते यांनी केले असून या कार्यक्रमाची प्रस्तावना – मा. सतीश देशपांडे ,आभार प्रदर्शन – मा. अजय डाळिंबकर सर , हे करणार आहेत .
या जयंती महोत्सवाची जय्यत तयारी राहुल युवक मंडळाचे अध्यक्ष सिद्धांत डाळींबकर व उपाध्यक्ष वैभव कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली विजयजी रोकडे , धर्मेंद्र रणदिवे , मनोज निकम , मधुकर वाघमारे , दिनेश काकडे , निलेश डोळस , सुरेश जाधव , राजु जगताप , स्वप्नील काकडे , मयूर रणदिवे , अलोक डाळिंबकर , प्रणीत थोरात , संदेश थोरात , गौतम गमरे (बौद्धचार्य), संदीप भालेराव, राजु सोरे, सुशील कांबळे, सचिन रोकडे, गौतम जाधव, प्रवीण पाटेकर, सुमान रणदिवे, तेजा कृष्णा कांबळे, निकेश फाळे, नितीन यादव, रवींद्र यादव, अमोल डाळींबकर , संगम विजय देशपांडे , विजय ठाकूर , बाळकृष्ण बनसोडे , श्रीकांत गायकवाड , श्याम मोरे , रवींद्र यादव , अमित यादव , लोकेश यादव, दिनेश पवार, संदीप भालेराव, कपिल डाळींबकर , सचिन रोकडे, प्रशिक डाळींबकर , प्रशात रोकडे, विजय जाधव, सचिन निकाळजे, विशाल , राहुल दिनेश पवार, सुमित गायकवाड, विनीत गायकवाड, मंगेश गायकवाड, आर्यन मोरे, सुदर्शन निकम, तक्षक डाळींबकर , शेखर गवळे, महेश गवळे आदी मेहनत करत आहेत .




