Uncategorized

……” कर्जतच्या भात शेतीचे सेलिब्रिटींना देखील आकर्षण “……

विख्यात गायक पद्मश्री " सोनू निगम " यांनी जाणून घेतले भात शेतीचे तंत्र - मंत्र !

कर्जत प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे कृषी विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ ” डॉ . रविंद्र मर्दाने ” यांनी केले स्वागत…..

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

कर्जतच्या पर्यटन भागाचे जसे आकर्षण संपूर्ण राज्याला आहे , तसेच येथील भात शेती , व भात शेती विकसित करण्याचे ” कसब ” कसे असेल , याची उत्सुकता सर्वांनाच असते . या आकर्षणाला देश व राज्यातील आता ” सेलिब्रिटी ” देखील आकर्षित होत असताना दिसत आहेत . भारतातील लोकप्रिय आणि अष्टपैलू पार्श्वगायक , संगीतकार , अभिनेते , ” पद्मश्री सोनू निगम ” यांनी आज अचानक कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राच्या कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राला भेट देऊन शेतीचे तंत्र आणि मंत्र जाणून घेतले. याप्रसंगी त्यांच्यासोबत त्यांच्या सुविद्य पत्नी फॅशन डिझायनर, उद्योजिका, क्लासिकल डान्सर ” मधुरीमा निगम “, मुलगा ” निवान ” आणि ठाकरे शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य तसेच गट नेते ” बाबू शेठ घारे ” आदी उपस्थित होते.

           यावेळी कृषी विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांनी त्यांना ” डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठाने ” विकसित व शिफारशीत केलेल्या भाताच्या विविध सुधारित व संकरित जातींची गुणवैशिष्ट्ये सांगितली , तसेच विविध फळपिके , मसाला पिके , कृषी यंत्रे व सुधारित अवजारांची इत्यंभूत माहिती दिली. शेतकऱ्यांचे भात शेतीतील कष्ट कमी करणारे सुधारित ” ड्रम सिडर ” व मनुष्य चलित लावणी यंत्र, ते वापरण्याची पद्धत ऐकून ते हरखून गेले. विशेष म्हणजे किफायतशीर शेतीचे ” तंत्र आणि मंत्र ” जाणून घेण्यात सोनू निगम कुटुंबीयांनी खूपच रस दाखविला. येत्या हंगामात कर्जत परिसरातील त्यांच्या फॉर्म हाऊस मध्ये कोकण कृषी विद्यापीठाचे वाण नक्की घेऊ , असे सांगून पुन्हा येण्याबद्दल आश्वस्त केले.

        यानिमित्ताने डॉ. रविंद्र मर्दाने यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले , आणि काळीमिरी ची कलमे भेट दिली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सोनू जगताप व मंदार म्हसे हे उपस्थित होते. पद्मश्री सोनू निगम व कुटुंबियांच्या अल्पशा भेटीने उपस्थितांना आश्चर्याचा तसेच आनंदाचा सुखद धक्का बसला . मात्र हि बाब शेती तंत्रज्ञानाच्या जगात खूपच ” गौरवास्पद ” असल्याचे दिसून येत आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!