…..” उपोषण सोडते वेळी दिलेल्या लेखी आश्वासनांचा मुख्याधिकाऱ्यांना पडला विसर “…..
पोलीस मित्र संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष " रमेश दादा कदम " करणार पुन्हा आमरण उपोषण !

….फक्त १ मागणी पूर्ण….उर्वरित मागण्यांचे काय ? रमेश दादा कदम यांचा ” संतप्त ” सवाल…..
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत नगर परिषद हद्दीत नागरिकांना खूप ” अडचणींना ” सामना करावा लागत असल्याने व कर्जत शहराला अनेक ” समस्यांनी ” घेरलेले असताना यावर उपाय योजना करण्यासाठी तर कर्जत नगर परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पोलीस मित्र संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश दादा कदम यांनी २५ फेब्रुवारी २०२६ रोजी ” आमरण उपोषणाला ” सुरुवात केली होती . यावर कर्जत नगर परिषद प्रशासनाचे मुख्याधिकारी ” तानाजी चव्हाण ” यांनी २७ फेब्रुवारी रोजी सर्व ११ मागण्या मान्य करून उपोषणाची सांगता झाली होती . मात्र आता दिड महिना झाला व पावसाला सुरुवात होण्याच्या वाटेवर असताना मागण्या पूर्ण कधी होणार , असा संतप्त सवाल पोलीस मित्र संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ” रमेश दादा कदम ” यांनी केला आहे .
यावेळी कर्जत नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या मनमानी व गैरकारभार विरोधात पोलीस मित्र संघटनेने पुकारलेले उपोषण दरम्यान खालील मागण्या केल्या होत्या-
१) नगरपरिषदेत बांधण्यात आलेल्या नाट्यगृहाच्या दयनीय अवस्थेची चौकशी करण्यात येऊन दयनीय अवस्थेची संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कायदेशीर कारवाई करावी.
२) नगरपरिषद हद्दीतील सर्व अनधिकृत अतिक्रमणांवर व गृहनिर्माण संस्थेतील पार्किंग जागेवरील सर्व प्रकारच्या अतिक्रमणांवर कायदेशीर कारवाई करावी.
३) नगरपरिषद हद्दीतील सर्व शौचालयात पाण्याची व्यवस्था शौचालयाची दररोज स्वच्छता करण्यात यावी व महिलांसाठी आवश्यक ठीकाणी स्वतंत्र नविन शौचालयाची सुविधा करण्यात यावी.
४) बेकायदेशीर छोटे मोठे सर्व होर्डिंग्जवर बंदी घालुन परवानगी शिवाय लावलेल्या बॅनरवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी.
५) शुक्रवार बाजार व दररोजचे भाजीपाला विक्रेते , फल विक्रेते व फेरीवाले विक्रेते व ईतर सर्व प्रकारचे विक्रेत्यांचा बाजार एका ठिकाणी न भरवता संपूर्ण बाजारपेठत प्रती आठवडा चक्राकार पद्धतीने भरवण्यात यावा.
६) नगरपरिषद हद्दीत सर्व आवश्यक ठिकाणी सी.सी.टीव्ही कॅमेरे तात्काळ लावण्यात यावेत.
७) नगर परिषद हद्दीतील रस्त्यावर पार्किंग करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांवर वाहतूक पोलीस व नगरपालिका मोटार वाहन कायदा १९८८ (कलम १७७) अंतर्गत नगरपरिषद व पोलीस ठाण्याने तात्काळ कायदेशीर कारवाई करावी.
८) शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे भरण्यात यावे , गटारांची झाकने दुरुस्ती करण्यात यावी. कोर्ट , पोलीस ठाणे , प्रशासकिय भवन व ईतर सर्व प्रशासकीय कार्यालये व महत्वाच्या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यावर मार्ग फलक लावण्यात यावेत.
८) गृहनिर्माण संस्थेच्या आवारात किंवा गृहनिर्माण संस्थांच्या आजु बाजूच्या रस्त्यावर अनधिकृत पार्किंग केलेल्या वाहनांवर मोटार वाहन अधिनियम कायद्याच्या कलम ७९ अन्वये गृहनिर्माण संस्थेने , वाहतूक पोलीसांनी व नगरपरिषदेने तात्काळ कायदेशीर कारवाई करावी.
१०) महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभागाच्या आदेश नुसार नदीपात्रातील पुररेषेचे सर्वेक्षण करून पुररेषेतील अतिक्रमणे काढून टाकण्याची कायदेशीर कारवाई तात्काळ नगरपरिषदेने करावी.
११) उपोषण दरम्यान नागरिकांनी उपस्थित केलेल्या सर्व मागण्या ग्राहय धरुन सर्व मागण्या तात्काळ पूर्ण करण्यात याव्यात.
१२) २०१७ रोजी विनायक किसन हरपुडे यांनी मिळकत नावे करून घेणे कामी अर्जा सोबत दाखल केलेली कागदपत्रे हेतुपुरस्कर गहाळ करून माहिती अधिकारात दिली जात नाही व मिळकत त्यांच्या नावे केली जात नाही व त्यांच्या बिल्डिंगला रस्ता नाही तो रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा व त्यांना माहिती अधिकारात कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात यावी.

यातील फक्त कर्जत शहरातील रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम आज दिनांक ८ एप्रिल २०२६ रोजी सुरू झाले असून , उर्वरित मागण्यांचे काय ? असा संतप्त सवाल करून उर्वरित मागण्यांची पुन्हा आठवण व्हावी , व कर्जत नगर परिषद प्रशासन जागे व्हावे , यासाठी पुन्हा एकदा ” आमरण उपोषणाचा ” मार्ग अवलंबणार असून मात्र यावेळी उपोषणाच्या मागण्या फक्त कागदोपत्री मान्य करून आमची ” मुस्कटदाबी ” करणाऱ्या या प्रशासनाला व मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांना ” सुतासारखे सरळ ” करणार , असा इशारा पोलीस मित्र संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ” रमेश दादा शांताराम कदम ” यांनी दिला आहे .



