Uncategorized

…..” कर्जत परिवर्तन विकास आघाडीचे जोरदार शक्ती प्रदर्शन “…..

नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार " पुष्पाताई हरिश्चंद्र दगडे " व २१ उमेदवारांनी भरले फॉर्म !

भव्य रॅलीत ” सुधाकर भाऊ घारे व नितीन दादा सावंत ” मतदारांना सामोरे…..

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

 

कर्जत नगर परिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीला आता चांगलाच ” रंग ” चढू लागला आहे . आज रविवार दिनांक १६ नोव्हेंबर २०२५ रोजी ” कर्जत परिवर्तन विकास आघाडीतील ” घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष , शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष , मनसे , स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष , व इतर पक्षातील उमेदवारांची भव्य रॅली संपूर्ण कर्जत शहरात फिरून प्रथम श्री धापया मंदिरात नारळ वाढवून नंतर छत्रपती शिवाजी महाराज , विश्व रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण व अभिवादन करून मतदार राजाला थेट नगराध्यक्ष पदाचे ओबीसी महिला उमेदवार ” सौ. पुष्पाताई हरिश्चंद्र दगडे ” व इतर २१ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र – उमेदवारी अर्ज कर्जत नगर परिषद कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी धनंजय जाधव यांच्याकडे सादर केले .

परिवर्तन विकास आघाडीचे या ” भव्य रॅली ” शक्ती प्रदर्शनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे , शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत , या प्रमुख नेत्यांसह आघाडीतील घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते . नागरिकांना सामोरे जाताना मतदार राजाने देखील या भव्य रॅलीस प्रचंड प्रतिसाद दिला . विविध पक्षातील झेंडे , राजकीय गाणी , यामुळे परिसरात नवचैतन्य उमटलेले दिसले .

यावेळी जिल्हाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे यांनी या निवडणुकीत कर्जत नगरीचे विकासात्मक परिवर्तन घडविण्यासाठी परिवर्तन विकास आघाडीला भरभरून साथ द्या , असे मत व्यक्त केले , तर उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत यांनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ. पुष्पाताई हरिश्चंद्र दगडे यांना सलग ३ वेळा निवडून आल्याने १५ वर्षांचा प्रदीर्घ राजकीय अभ्यास आहे , तर २१ उमेदवार देखील आपल्या प्रभागातील जनतेची सेवा करणारे असल्याने येणाऱ्या ०३ तारखेला कर्जत परिवर्तन विकास आघाडीचा झेंडा या नगर परिषदेवर फडकेल , असा आमचा विश्वास आहे , असे मत व्यक्त केले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!