Uncategorized

…..” कर्जतमध्ये भारतीय जनता पार्टीला खिंडार “…..

भाजपचे " मा. नगरसेवक बळवंत घुमरे व मा. नगरसेविका बिनीता घुमरे " यांचा अनेक कार्यकर्त्यांसह " राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात " प्रवेश !

जिल्हाध्यक्ष ” सुधाकर भाऊ घारे ” यांचे हात मजबूत…..

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

गेली ३५ वर्षे भारतीय जनता पक्षाचे क्रियाशील सदस्य असलेले माजी नगरसेवक ” बळवंत घुमरे ” व माजी नगरसेविका ” सौ. बिनीता घुमरे ” यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह आज शनिवार दिनांक १५ नोव्हेंबर २०२५ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ” सुधाकर भाऊ घारे ” यांच्या कार्यावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जनसंपर्क कार्यालय कर्जत येथे पक्ष प्रवेश केला . त्यामुळे तोंडावर असलेल्या कर्जत नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढली असून जिल्हाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे यांचे हात अधिक ” मजबूत ” झाले आहेत .

भारतीय जनता पक्ष व घुमरे मित्र मंडळाच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य , आरोग्य शिबिर , आभा कार्ड शिबिर , मोतीबिंदू मुक्त कर्जत तालुका असे अनोखे अभियान राबवून कर्जत शहाराबरोबरच तालुक्यात उल्लेखनीय कार्य करणारे ” घुमरे दांपत्य व मित्र परिवार ” गेली दोन दशके राजकीय क्षेत्रात भाजपात सक्रिय होते . मात्र स्थानिक पातळीवर भाजपा गटातटात विभागली गेली असून पक्ष वाढीसाठी नाही तर स्वतःचे अस्तित्व अबाधित कसे राहील , यावर भर देणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या ” कट कारस्थानामुळे ” आपण पक्ष सोडत असून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील होत असल्याचे मा. नगरसेविका बिनीता घुमरे यांनी भावनिक होऊन मत व्यक्त केले . त्या भाजप कडून थेट महिला नगराध्यक्ष पदाच्या इच्छुक उमेदवार असताना पक्षाने देखील त्यांना योग्य न्याय देणे , गरजेचे असल्याने जिल्हा नेतृत्वाने या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे .

याप्रसंगी गुंडगे विभाग अध्यक्षा स्मिता दिनेश सविते , बिना सविते , धनंजय जोशी , करण घुमरे , व इतर कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला . अजून अनेक कार्यकर्ते आमच्या संपर्कात असून लवकरच त्यांचाही पक्ष प्रवेश होईल , असे मत माजी नगरसेवक बळवंत घुमरे यांनी व्यक्त केले . यावेळी परिवर्तन विकास आघाडीचे नेते नितीन दादा सावंत , तालुका प्रमुख बाजीराव दळवी , संघटक बाबू घारे व इतर पदाधिकारी उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!