……” महायुतीत भाजपची गरुड भरारी “……
" भाजपाच्या डॉ. स्वाती अक्षय लाड " या कर्जत नगर परिषदेवर थेट नगराध्यक्ष पदी जाहीर !

पूर्ण ” ताकदीनिशी ” निवडणुकीला सामोरे जाऊन ” विजयी ” संपादन करणार – मा. आमदार सुरेश भाऊ लाड

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना – भाजप – आर पी आय अशी महायुती झाली असून हे तिन्ही पक्ष एकत्रित येऊन निवडणुकीस सामोरे जाणार असून ओबीसी महिला आरक्षण थेट नगराध्यक्ष पदासाठी हि जागा भारतीय जनता पक्षाला देण्यात आली असून या थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून ” डॉ. स्वाती अक्षय लाड ” यांच्या नावाची अधिकृत घोषणा भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी आज शनिवार दिनांक १५ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री ८ वाजता माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांच्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेत करण्यात आली .
यावेळी शिवसेना १२ भाजपा ०७ किंवा ०८ व आर पी आय ०२ अश्या जागा वाटपाचा फॉर्मुला या पत्रकार परिषदेत आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी सांगितला. या निवडणुकीत जागा वाटपावरून आर पी आय पक्ष नाराज नसून आम्ही सर्व एकत्रित येऊन या निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी उतरणार व विजयी संपादन करणार , असे माजी आमदार तथा भाजपा प्रदेश सदस्य सुरेश भाऊ लाड यांनी पत्रकारांच्या प्रश्नांवर उत्तर दिले .
या पत्रकार परिषदेत पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर , आमदार महेंद्र शेठ थोरवे , माजी आमदार सुरेश भाऊ लाड , भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी , जिल्हाप्रमुख संतोष शेठ भोईर , युवा जिल्हा प्रमुख प्रसाद थोरवे , जिल्हा नेते तानाजी चव्हाण , वसंत शेठ भोईर , जिल्हा सरचिटणीस दिपक बेहरे , जिल्हा सचिव रमेश दादा मुंढे , जिल्हा उपाध्यक्ष मंगेश म्हसकर , मा नगरसेविका स्वामिनी मांजरे , मा. उपसभापती मनोहर दादा थोरवे , मा. उपनगराध्यक्ष शरद भाऊ लाड , किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे , मा. नगराध्यक्षा रजनी गायकवाड , ॲड. सुषमा ढाकणे ,भाजप महिला ता. अध्यक्षा नम्रता कांदळगावकर , मा नगरसेविका विशाखा जिनगिरे , कर्जत शहर अध्यक्ष विजय जिनगिरे , राजेश भगत , शिवसेना प्रवक्ते रमाकांत जाधव , त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .
यावेळी महायुतीचे सर्व उमेदवार सोमवार दिनांक १७ नोव्हेंबर २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांना कर्जत नगर परिषद कार्यालयात सकाळी १० वाजता जमून सादर करणार असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्पष्ट केले .


