” शिवसेना शिंदे गट प्रभाग क्रमांक ४ चे इच्छुक उमेदवार नदीम भाई खान एक्शन मोड वर “……

आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या ” हिरव्या झंडी ” च्या प्रतिक्षेत !
पूर्ण तयारीनिशी निवडणूक प्रचाराची ” व्यूहरचना ” तयार……
प्रभागातील नागरिकांच्या पाठिंब्याने ” विजयाचा भगवा ” फडकणार……
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
गेली दहा वर्षे योग्य ” आरक्षण ” न पडल्याने हुलकावणी देत असलेल्या प्रभाग क्रमांक ४ मध्ये आता सर्वसाधारण आरक्षण पडल्याने शिवसेना शिंदे गटाचे कर्जत शहर संघटक व नागरिकांच्या मनामनात आपल्या ” उत्तुंग कार्याने ” घर केलेले जनसेवक – शिवभक्त नदीम भाई युसुफ खान यावेळी निवडणुकीस इच्छुक असून कर्जत खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार ” महेंद्र शेठ थोरवे ” यांच्या ” हिरवी झंडी ” दाखवून अधिकृत उमेदवारी कधी देतात या प्रतिक्षेत आहेत . आपल्या लहानपणा पासूनच्या हक्काच्या प्रभागात नागरिकांच्या वाढत्या पाठिंब्याने त्यांच्या ” विजयाचा मार्ग ” सुकर होणार असल्याचे चित्र सध्या प्रभाग क्रमांक ४ मध्ये दिसून येत आहे .
आजपर्यंत शिवभक्त नदीम भाई खान त्यांच्या कार्यात ” ८० टक्के ” समाजकारण दिसत असल्याने सर्वच क्षेत्रात त्यांचे कार्य वाखाणण्याजोगे आहे . अगदी मनापासून ” तन मन धन ” अर्पण करून करत असलेल्या त्यांच्या समाजसेवेमुळे प्रभागातील नागरिकांचा त्यांना वाढता पाठिंबा आहे . सर्व समाज बांधवांशी त्यांचे अतूट संबंध आहेत . ” सर्व धर्म समभावाचे ” प्रतीक अशी त्यांची प्रतिमा आहे . वर्षाच्या बारा महिने ” परोपकारी ” होवून नेहमीच आपल्या कर्जत – खाटीक आळी येथील जनसंपर्क कार्यालय ” महेंद्र गड ” येथून त्यांचे कार्य सुरू असते .
छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढे नेणाऱ्या जनसेवकाला ” लोकप्रतिनिधी – नगरसेवक ” या पदास साजेसे काम करणाऱ्या या ” नेतृत्वास ” कर्जत नगर परिषदेत ” विजयाचा मार्ग ” त्यांच्या आजपर्यंतच्या कार्यामुळे , त्यांच्या अतूट नात्यामुळे व नागरिकांच्या पाठिंब्याने शिवसेनेची अधिकृत उमेदवारी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी दिल्यास या प्रभागात सर्व ताकदीने ते शिवसेनेचा ” भगवा ” डौलाने फडकवणार , यांत शंकाच नसेल . त्यांची प्रचाराची सर्व यंत्रणा सज्ज असून ते ” एक्शन मोड ” वर आहेत . त्यांच्या अधिकृत उमेदवारीची फक्त घोषणा होण्याची प्रतिक्षा शिवसेनेचे इच्छुक उमेदवार ” नदीम भाई खान ” यांना असून त्यांना अधिकृत उमेदवारी मिळणार , असे मत त्यांनी व्यक्त केले आहे .



