Uncategorized

…….” वाढदिवस एका विकास कार्यसम्राटाचा – संघर्ष नायकाचा “…..

" कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे " यांचा " वाढदिवस " मोठ्या उत्साहात साजरा !

कर्जत – खालापूर तालुक्यातील हजारोंच्या संख्येने उपस्थित रहात त्यांच्या ” चाहत्यांनी ” दिल्या शुभेच्छा…..

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

कर्जत खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट लाडके आमदार तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे अत्यंत निकटवर्तीय असे ” महेंद्र शेठ सदाशिव थोरवे ” यांचा ७ एप्रिल हा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला . सकाळ पासूनच त्यांच्या चाहत्यांनी तसेच पक्ष कार्यकर्त्यांनी व मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शिवसेनेचे संपर्क कार्यालय ” बाळासाहेब भवन ” येथे एकच गर्दी केली होती .

          वाढदिवसाचे औचित्य साधून पूर्वसंध्येला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या . यावेळी शुभेच्छा देण्यासाठी सकाळ ते रात्री पर्यंत अनेक ” चाहत्यांनी ” एकच गर्दी केली होती .

       

      या वाढदिवसाच्या निमित्ताने कर्जत – खालापूर तालुक्यात अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले . यांत आरोग्य शिबिर , रक्तदान शिबिर , उद्घाटने , भरघोस बक्षिसांचे नाईट क्रिकेट सामने , बैल गाडा शर्यत , भक्तिगीते कार्यक्रम , अन्नदान , त्याचप्रमाणे अनेक समाजपयोगी कार्यक्रम पार पडले . यावेळी राजकीय – सामाजिक – शैक्षणिक – धार्मिक – सांस्कृतिक – प्रशासकीय – कला – क्रिडा , अश्या अनेक क्षेत्रातील नागरिकांनी – ज्येष्ठांनी – तरुण वर्गांनी पुष्पगुच्छ व सन्मानित करत या राजकीय संघर्ष नायकाला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!