…..” सन्मान कला रत्नाचा – ख्यातनाम कलाकार सुनील डी. परदेशी यांचा “……
“ आर्ट बिट्स महाराष्ट्र कला सन्मान पुरस्कार २०२६ ” साठी सुनील परदेशी यांची निवड !

कर्जत तालुक्याचा ” चित्रकला ” क्षेत्रात मानाचा तुरा……
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
गेली ४० वर्षे ” कला ” क्षेत्रात आपल्या चिकाटीने पाय रोवून निसर्गातील विविध पैलूंचे ” चित्रीकरण ” करत आपली ” सुप्त कला ” जगासमोर दाखवून कर्जत तालुक्यातील ” सुनील परदेशी ” या अनमोल रत्नाने आपल्या कला कौशल्याने ” सप्त रंगाची ” उधळण करत सातासमुद्रा पलीकडे ” कर्जत ” चे नाव मानाने फडकत ठेवले . विविध चित्रीकरणात ” सामाजिक अर्थ ” दडलेले असल्याने या ” कला रत्नाला ” सन्मानित करून भविष्यात अजून गगनात ” गरुड भरारी ” घेण्यासाठी त्यांच्या पंखात बळ मिळावे , म्हणून राज्यस्तरीय पुण्यातील “ आर्ट बिट्स फाउंडेशनने ” प्रतिष्ठेचा समाजाला जाणारा ” आर्ट बिट्स महाराष्ट्र कला सन्मान पुरस्कार २०२६ ” साठी कर्जत शहरातील ” सुनील चिक्कीचे ” मालक सुनील परदेशी यांची निवड करण्यात आली आहे .

त्यांची झालेली निवड हि , कला क्षेत्रासाठी अभिमानास्पद अशी बातमी आहे . रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील नामांकित कलाकार सुनील डी. परदेशी यांची “आर्ट बिट्स महाराष्ट्र कला सन्मान पुरस्कार २०२६” साठी निवड करण्यात आली आहे .” आर्ट बिट्स फाउंडेशन ” या संस्थेकडून दरवर्षी प्रदान केला जाणारा हा पुरस्कार महाराष्ट्रातील ” कला क्षेत्रात ” उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलाकारांना दिला जातो. दरवर्षीप्रमाणे जून – जुलै महिन्यात या पुरस्काराची घोषणा केली जाते , आणि यंदा हा मान ” सुनील परदेशी ” यांना जाहीर झाला आहे. संस्थेने अधिकृत पत्राद्वारे आनंद व्यक्त करत त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाची दखल घेतली आहे.

कलारत्न सुनील परदेशी यांचे शिक्षण एल एस रहेजा स्कूल ऑफ आर्ट येथे झाले असून चित्रकलेची आवड त्यांना लहानपणापासून होती . पुढे बारावीनंतर कलेच्या कॉलेजमधून पदवी घेतली व मुंबईत बहुतांश गॅलरीत मध्ये त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन केले . दोन वेळा त्यांचे चित्रांचे प्रदर्शन सिग्नेचर मेंबर ऑफ येथे झाले असून ” पेस्टल सोसायटी अमेरिका ” मध्ये निवड त्यांची झाली आहे . कर्जत मध्ये सांस्कृतिक क्षेत्रात त्यांची रांगोळी अव्वल असते . या हाताखंड्यातून त्यांनी नवनवीन कलाकार तयार केले आहेत . नवीन कलाकार तयार व्हावे , ही एक त्यांची इच्छा म्हणून मार्गदर्शन करण्यास सुरुवात त्यांनी केली असून , देश विदेशात त्यांची बरीच चित्रांची विक्री झाली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले . त्यांच्या या यशात त्यांचे आई वडील , तर पत्नी व कुटुंबातील सदस्यांचा या यशात खूप मोठा वाटा असल्याचे ते सांगत आहेत .

या सन्मानामुळे सुनील परदेशी यांच्या ” कला प्रवासाला ” अधिक बळ मिळणार असून, रायगड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या ” सांस्कृतिक क्षेत्राचा ” गौरव वाढला आहे , तर कर्जत तालुक्याचे नाव ” सुवर्ण अक्षरात ” कोरले गेले असून , कला क्षेत्रात ” मानाचा तुरा ” सुनील परदेशी यांच्या माध्यमातून रोवला गेला आहे .




