…..” महापुरुषांच्या जयंती निमित्त पंचशील नगर – गुंडगे येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न “…..
अनेक " नागरिकांनी व महिलांनी " घेतला लाभ !

” जीतरत्न मनोहर जाधव आणि नरेश मधुकर जाधव ” यांचा पुढाकार…..
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
स्त्री शिक्षणाचे उद्धारक ” राष्ट्रपिता ज्योतिराव फुले ” यांच्या १९९ व्या आणि भारतीय घटनेचे शिल्पकार – विश्व रत्न ” डॉ.बाबासाहेब आंबेडकर ” यांच्या १३५ व्या जयंती निमित्त कर्जत नगर परिषद हद्दीतील पंचशील नगर – गुंडगे येथे मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन जीतरत्न मनोहर जाधव आणि नरेश मधुकर जाधव यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आले होते . यावेळी प्रभागातील अनेक नागरिकांनी व महिलांनी तपासणी करून या शिबिराचा लाभ घेतला .

रविवार दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी पंचशील नगर – गुंडगे येथील समाज मंदिरात सकाळी १० ते ३ वाजे पर्यंत ” रायगड हॉस्पिटल ” यांच्या सहकार्याने राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांच्या १९९ व्या आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरामध्ये ” रायगड हॉस्पिटल ” डिकसळ येथील डॉक्टर आणि स्टाफ हे उपस्थित राहून रायगड हॉस्पिटल च्या सहकार्यातून तपासणी करण्यात आली . त्यामुळे हे शिबिर व्यवस्थित पार पडले.

या शिबिरा मध्ये पंचशील नगर आणि गुंडगे तसेच आजुबाजूच्या परिसरातील अनेक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व डॉक्टर्स यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले व दिप आणि धूप प्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जीतरत्न मनोहर जाधव यांनी केले. रायगड हॉस्पिटल च्या केलेल्या अमूल्य सहकार्य बद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार त्यांनी व्यक्त केले. या शिबिरासाठी पंचशील नगर येथील अनेक कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली .





