……” कर्जतमध्ये ” भगवान महावीर ” यांची जयंती उत्साहात साजरी “……
संपूर्ण " जैन समाज " सामील होत केला आनंदोत्सव !

आचार्य श्रीमद् ” विजय कीर्तियशसूरीश्वरजी महाराज ” यांची भव्य मिरवणूक संपन्न……
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
जगाला दया – क्षमा – शांती व अहिंसा यांची शिकवण देणारे जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर ” भगवान महावीर ” यांची जयंती मोठ्या उत्साहात कर्जत मध्ये साजरी करण्यात आली . यानिमित्ताने संपूर्ण कर्जतमध्ये भगवान महावीर यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली . या भव्य मिरवणुकीत सर्व जैन समाज , महिला वर्ग सहभागी होत सर्वांनी ” आनंदोत्सव ” साजरा केला . 

आजच्या या चैत्र शुद्ध शुभ दिनी तपागच्छाधिपति, महाराष्ट्र देशोद्धारक, व्याख्यान वाचस्पति परम पूज्य आचार्यदेव श्रीमद् विजय रामचन्द्रसूरीश्वरजी महाराज यांचे सुशिष्यरत्न प्रवचन प्रभावक, करुणा के सागर परम पूज्य आचार्यदेव ” श्रीमद् विजय कीर्तियशसूरीश्वरजी महाराज ” यांचे शुभ प्रवेश कर्जत नगरीत झाल्याने व त्यांच्या समवेत २ – २ आचार्य भगवंत एवं साधु भगवंत त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली .परम पूज्य आचार्यदेव श्रीमद् विजय कीर्तियशसूरीश्वरजी महाराज ३०० हून अधिक रजोहरणदाता , २०० हून अधिक अंजनशलाका महोत्सव सम्पन्न , १५००० हून अधिक तास प्रवचन देणारे , १०००० हून अधिक भक्तांना ” णमोकार मंत्र ” प्रदान करणारे , ३ करोड श्लोक चे लेखन करणारे , ५०००० हून अधिक सूत्रमंत्र जाप करणारे , ७०००० हून अधिक कि.मी. पदयात्रा ( विहार ) करणारे , ६० हून अधिक निर्मल संयम जीवन तथा जनतेची सेवा करणारे , असा त्यांचा नाव लौकिक आहे .
त्यांची भव्य प्रवेश मिरवणूक तुलसी आंगन इमारत , कर्जत ते संपूर्ण कर्जत नगरीत निघून या मिरवणुकीचा समारोप जैन मंदिर येथे झाला . या भव्य प्रवेश मिरवणुकीत संपूर्ण जैन समाज , महिला वर्ग , तरुण – तरुणी , लहान मुले सामील झाली होती . नंतर त्यांचे प्रवचन ऐकण्याचे भाग्य व आशीर्वाद सोहळा पार पडला . यामुळे संपूर्ण कर्जत नगरी सजलेली होती व धार्मिक वातावरणाने प्रफुल्लित व आनंदित झाली होती .





