…..” कर्जत भीम महोत्सव – २०२६ च्या अध्यक्ष पदी सचिन भाऊ भालेराव यांची निवड “……
विश्वरत्न " डॉ बाबासाहेब आंबेडकर " यांची जयंती होणार उत्साहात साजरी !

सचिव पदी ” कृष्णा जाधव ” तर खजिनदार पदी ” ॲड. उदय जाधव ” यांची एकमताने नियुक्ती…..
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील कर्जत तालुक्यात ” तथागत भगवान गौतम बुद्ध – सम्राट चक्रवर्ती अशोक – छत्रपती शिवाजी महाराज – राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले – छत्रपती शाहू महाराज – विश्वरत्न महामानव क्रांतीसूर्य बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर ” या महापुरुषांची संयुक्त जयंती ” भीम महोत्सव २०२६ ” पर्व ९ ची जयंती कमिटी नुकतीच सर्वांच्या एकमताने जाहीर झाली असून , यावेळचे अध्यक्ष पदाचा मान आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष ” सचिन भाऊ भालेराव ” यांची निवड करण्यात आली तर खजिनदार पदी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) चे कर्जत शहर अध्यक्ष ॲड. उदय जाधव व सचिव पदी ठाकरे शिवसेनेचे उपशहर प्रमुख कृष्णा जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली .

शनिवार दिनांक ०४ एप्रिल २०२६ रोजी कर्जत तालुक्यातील छत्रपती – फुले – शाहू – आंबेडकरी चळवळीतील , बहुजन वर्गातील मान्यवर , पक्षाचे पदाधिकारी , विविध क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते यांची बैठक आयोजित करण्यात आली होती .
यावेळी सर्वानुमते हि निवड करण्यात आली . दर वर्षी या भीम महोत्सवा निमित्ताने विविध प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते , वकृत्त्व स्पर्धा , गायन स्पर्धा , व्याख्याने , महापुरुषांच्या प्रतिमांची भव्य मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात व डी जे च्या तालावर आयोजित करण्यात येते . मिरवणुकीस येणाऱ्या सर्व बहुजन वर्गास भोजनाची देखील व्यवस्था करण्यात येते .

लवकरच या भीम महोत्सवाची तारीख ठरवण्यात येणार असून या निमित्ताने कर्जत खालापूर तालुक्यातील सर्व नागरिक , बौद्ध बांधव , आंबेडकरी अनुयायी , बहुजन वर्ग एकत्र येऊन महापुरुषांच्या विचारांचा जल्लोष साजरा करतात . या निवडीमुळे भीम महोत्सवाचे अध्यक्ष सचिन भाऊ भालेराव , खजिनदार ॲड. उदय जाधव तसेच सचिव कृष्णा जाधव यांना अनेकांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन व्यक्त केले .




