Uncategorized

……” कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन “…..

७ एप्रिल " संघर्ष नायकाचा " वाढदिवस !

कर्जतमध्ये ” न भूतो न भविष्यती ” असे सामाजिक उपक्रम…….

भिसेगाव- कर्जत / सुभाष सोनावणे – 

कर्जत – खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार व तरुणांचे आधारस्तंभ , लक्षभेदी, कार्यकुशल, संयमी , तडफदार , कणखर नेतृत्व , आमदार ” महेंद्रशेठ थोरवे ” यांचा ७ एप्रिल २०२६ या दिवशी वाढदिवसानिमित्ताने ” आमदार महेंद्रशेठ थोरवे फाउंडेशन ” यांच्या माध्यमातून कर्जत खालापूर तालुक्यात समाजपयोगी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे . हा सोहळा ” न भूतो , न भविष्यती ” असा होणार असून संपूर्ण रायगड सहित कर्जत – खालापूर मतदार संघाचे लक्ष याकडे लागून आहे . 

          महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन आदरणीय मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेले कर्जत – खालापूर मतदार संघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार श्री. महेंद्रशेठ थोरवे यांच्या वाढदिवसा निमित्त ” अभिष्टचिंतन सोहळा ” मंगळवार दि . ७ एप्रिल २०२६ रोजी ” बाळासाहेब भवन ” येथे आयोजित करण्यात आला आहे , या निमित्ताने विविध सामाजिक कार्यक्रम आरोग्य शिबिर , क्रिकेटचे सामने , बैल गाडा शर्यत , वस्तू वाटप , उदघाटने , आयोजित करण्यात आले असून या कार्यक्रमासाठी रायगड जिल्ह्यासहित कर्जत – खालापूर विधानसभा मतदारसंघातील आमदारांसहित , अनेक मान्यवर शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत . यामुळे ” न भूतो न भविष्यती ” असा होणारा हा ” अभिष्टचिंतन सोहळा ” पाहण्यास हजारोंच्या संख्येने कर्जतकर , महेंद्र शेठ थोरवे मित्रपरिवार , शिवसेना व मित्र पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत . 

       यावेळी सकाळी ९.०० ते रात्रौ ९.०० वाजेपर्यंत ” बाळासाहेब भवन ” जनसंपर्क कार्यालय , कर्जत येथे आमदार महेंद्र शेठ थोरवे हे शुभेच्छा स्विकारणार आहेत . सायंकाळी ७ ते रात्री १०.०० वाजेपर्यंत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका : अंजली व नंदिनी गायकवाड यांची सुरेल संगीत मैफिल (भावगीत व भक्ती गीतांचा कार्यक्रम) स्थळ : प्रति पंढरपुर आळंदी, श्रीरामपुल, कर्जत, येथे आयोजित केले आहे . तरी शिवसेना, युवासेना व महिला आघाडी कर्जत – खालापूर विधानसभा मतदार संघ , आमदार महेंद्र शेठ फाउंडेशन यांच्यावतीने या अभिष्टचिंतन वाढदिवस सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे निमंत्रण व आवाहन करण्यात आले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!