…..” आली रे आली भीम गर्जना मित्र मंडळाची ” भीम जयंती आली “…..
दरवर्षी " जयंतीत व मिरवणुकीत " भव्य शक्ती प्रदर्शन !

कर्जतमध्ये ” डॉ बाबासाहेब आंबेडकर ” यांच्या जयंती निमित्त ” योगेश आप्पा गायकवाड ” यांनी बॅनरबाजीने उठवले निळे वादळ…….
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जतमध्ये विश्वरत्न ” डॉ बाबासाहेब आंबेडकर ” यांच्या जयंतीत व मिरवणुकीत ” निळ्या शक्तीचे ” अलोट दर्शन घडविणारे व ” निळे वादळ ” उठविणारे , तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेले ” डॅशिंग नेतृत्व ” म्हणजे कर्जत बौद्ध नगर येथील ” भीम गर्जना मित्र मंडळाचे ” संस्थापक आधारस्तंभ तथा सामाजिक कार्यकर्ते ” योगेश आप्पा गायकवाड ” यांच्याकडे बघितले जाते . दरवर्षी योगेश आप्पा गायकवाड यांच्या ” बॅनरबाजीची व भव्य मिरवणुकीची ” चर्चा संपूर्ण कर्जत तालुक्यात होत असते .

यावर्षी देखील भारतीय घटनेचे शिल्पकार – क्रांती सूर्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधत कर्जत नगर परिषद हद्दीत संपूर्ण बाजारपेठेत कर्जत बौद्ध नगर येथील ” भीम गर्जना मित्र मंडळाने ठिकठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची बॅनरबाजी करत बहुजन समाजात ” ऊर्जा ” पोहचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य मंडळाचे सर्वेसर्वा ” योगेश आप्पा गायकवाड ” यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केली आहे . जणू काही ” निळे वादळ ” उठल्यागत वातावरण दिसत असून भव्य प्रवेशद्वार व बॅनरबाजीमुळे संपूर्ण परिसर ” निळेमय ” झाले आहे .

यावेळी देखील बुधवार दिनांक १५ एप्रिल २०२६ रोजी महापुरुषांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक ” कर्जत बौद्ध नगर ते डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक ” अशी संपूर्ण बाजारपेठेतून डी.जे. च्या तालावर नाचत , जयघोष व घोषणाबाजी करत , ढोल ताशांच्या गजरात , सप्तरंती दिव्यांच्या झोतात , व फटाक्यांची आतिषबाजी करत अशी ” हटके ” मिरवणूक निघत असते . या भव्य मिरवणुकीस ” भीम गर्जना मित्र मंडळाचे ” सर्वेसर्वा योगेश आप्पा गायकवाड यांचे नेतृत्वाखाली अध्यक्षीय मंडळ पदाधिकारी , कार्यकर्ते , कर्जत बौद्ध नगर मधील तमाम बौद्ध बांधव व महिला भगिनी ” सामील होत असतात .

तरी या ” भीम गर्जना मित्र मंडळाच्या ” या भव्य – दिव्य – उल्लेखनीय – नेत्रदिपक – उल्हासित – हटके असलेल्या या मिरवणुकीकडे दरवर्षी सर्वांचेच लक्ष लागून असते . महापुरुषांचे विचार बॅनरबाजी करून व भव्य मिरवणुकीतून जोरदार घोषणाबाजी करून जन माणसात रुजवून ” मन – बुद्धी व शरीरात ऊर्जा ” निर्माण करणाऱ्या या भीम गर्जना मित्र मंडळ व त्याचे सर्वेसर्वा आधारस्तंभ ” योगेश आप्पा गायकवाड ” यांच्या या जयंतीचे व मिरवणुकीचे म्हणूनच सर्वत्र वाहवा होत असते .

या जयंती महोत्सवात सर्व बौद्ध बांधव , बहुजन वर्ग , तमाम कर्जतकर नागरिक , मित्र मंडळी , आप्तेष्ट , सर्व मुस्लिम समाज , जैन समाज , हिंदू बांधव व इतर सर्वांनी सामील होऊन आपला महापुरुषांच्या प्रती आदर दाखवून आनंद द्विगुणित करावा , असे आवाहन व नम्र विनंती भीम गर्जना मित्र मंडळाचे संस्थापक आधारस्तंभ व तरुण नेतृत्व ” योगेश आप्पा गायकवाड ” व नव निर्वाचित नगरसेविका ” सौ. सुमिता योगेश आप्पा गायकवाड ” यांनी केले आहे .





