Uncategorized

” श्रीरामनवमी ” उत्सवा निम्मित भाजी व्यापारी असो . कर्जत तर्फे लाडू प्रसादाचे वाटप !

४६ वर्षांची धार्मिक उत्सवाची परंपरा !

अनेक भाविकांनी घेतला लाडू प्रसादाचा लाभ……

भिसेगाव- कर्जत/ सुभाष सोनावणे – 

कर्जत नगर परिषद हद्दीतील कर्जत रेल्वे स्टेशन बाहेर असलेल्या भाजी मार्केट हे सन १९८० पासून येथे ” श्रीराम नवमी उत्सव ” साजरा करण्याची परंपरा आजपर्यंत सुरू आहे . ” श्रीरामनवमी उत्सव ” कर्जत भाजी व्यापारी असोसिएशनने व इतर भाविक विक्रेत्यांनी यावर्षी ४६ वर्षांची धार्मिक परंपरा जोपासत गुरुवार दिनांक २६ मार्च २०२६ रोजी सकाळी ” श्रीरामाच्या ” प्रतिमेचे पूजन करून लाडू वाटपाचे आयोजन केले होते . यावेळी या भंडारा रुपी प्रसादाचे स्टेशन परिसरातील अनेक भाविकांनी त्याचा लाभ घेतला . 

         कर्जत रेल्वे स्टेशन बाहेरच असलेल्या भाजी मार्केट परिसरात दरवर्षी मोठ्या उत्साहात ” श्रीरामनवमी उत्सवाचे ” औचित्य साधून श्रीसत्यनारायणाची महापूजा , श्रीराम पूजन व भंडारा रुपी प्रसादाचे आयोजन केले जात असते , मात्र कोरोना काळात हा उत्सव खंडित झाला होता . म्हणूनच आता प्रत्येक वर्षी मोठा उत्सव न करता फक्त ” श्रीरामाचे ” पूजन करून भंडारा वाटप करण्यात येतो . यावेळी येथील नागरिकांनी या प्रसादरुपी लाडू प्रसादाचा लाभ घेतला . 

         सदरच्या उत्सवात रामसिंग लोवंशी , नारळ पाणी विक्रेते विजू शेठ वर्मा , कृपाराम लोवंशी , लस्सीवाले विजू गुप्ता , स्वरूप लोवंशी , सुरेश शहा , सचिन मरगले आदी सभासद उपस्थित राहून त्यांनी मेहनत घेऊन हा ” श्रीरामनवमी उत्सव ” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .यावेळी रेल्वे प्रवासी , कर्जतकर नागरिक , रेल्वे रिक्षा चालक मालक संघटना , गावरान फळे विक्रेते यांनी या भंडारा रुपी लाडू प्रसादाचा लाभ घेतला .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!