Uncategorized

…..” निपुण सखी , या सर्वोच्च पुरस्काराने ॲड. पूजा सुर्वे यांना सन्मानित “……

राजिप शाळा तिघर येथे ८ मार्च " जागतिक महिला दिन " उत्साहात साजरा !

महिलांचे ” वैयक्तिक जीवन ” आज हि खडतर , तर आज हि स्त्री ” सुरक्षित ” नाही – ॲड. पूजा सुर्वे यांची खंत……

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

कर्जत तालुक्यातील तिघर रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत ८ मार्च ” जागतिक महिला दिन ” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात अनेक महिला मान्यवर , शाळेचे शिक्षक वर्ग , विद्यार्थी व पालक उपस्थित होते. 

         यावेळी कार्यक्रमाचे आयोजन अतिशय सुंदर केले होते , याप्रसंगी प्रथम महिला मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्त्री शिक्षणाच्या उद्धारक सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . मुलांनी सुमधूर सुरात स्वागत पर गीत गायनाने पाहुण्यांचे स्वागत केले . जनार्धन पजई सरांनी प्रास्ताविक केले , तर सौ. कांचन देशमुख यांनी महिलांना मार्गदर्शन केले व आशाताई देशमुख यांनी काव्यात्मक सादरीकरण केले . यावेळी प्रमुख पाहुण्या ॲड . सौ. पूजा सुर्वे यांनी महिला दिनाचे महत्व सांगून आज ही महिलाच्या वैयक्तिक जीवनात ” खडतर ” प्रवास आहे . तो कसा याचे मार्गदर्शन पर उद्देश केला. आज ही स्त्री ” सुरक्षित ” नाही , याची खंत व्यक्त केली . 

        या कार्यक्रमास आलेल्या इतर महिलांनी ही उत्कृष्ट असा कार्यक्रमात सहभाग घेतला होता. कोमल म्हात्रे, हिरा खुटारे ,करिष्मा धामणसे ,अश्विनी ढाकोळ , भारती साठे , वेदिका म्हात्रे , स्वरा खुटारे , सदाशिव बांबळे सर, जनार्धन पजई सर यांनी ८ मार्च २०२६ या ” जागतिक महिला दिन ” कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले होते . सामाजिक – राजकीय – शैक्षणिक – धार्मिक – सांस्कृतिक – कला – क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व महिला शक्तीला खऱ्या अर्थाने ” आधार ” देत त्यांचे सर्व बाजूने सक्षमीकरण करणाऱ्या ॲड. पूजा प्रताप सुर्वे यांचे कार्य ” अनमोल ” असल्याने त्यांना या स्त्री क्षितिजावर कार्य करण्यास गरुड भरारी घेण्यास त्यांच्या पंखात बळ मिळावे म्हणून ” निपुण सखी ” हा सर्वोत्कृष्ट पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले . तर इतर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांना सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

         माझ्या कार्याला ” निपुण सखी ” या सुवर्ण अलंकाराने गौरविण्यात आल्याने ॲड . पूजा सुर्वे यांनी राजिप शाळा तिघर शिक्षक वर्ग यांचे आभार व्यक्त करत , या पुरस्काराने मला अधिक जोमाने कार्य करण्यास ” बळ ” मिळेल , म्हणून मी शाळेची कायम ऋणी राहीन , असे मत व्यक्त केले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!