Uncategorized

…..” महिला शक्ती ४० + चषक स्पर्धा बामचा मळा मैदान दहिवली येथे यशस्वीरित्या संपन्न “…..

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन " ४० + क्रिकेट संघटना व इलेव्हन स्टार संघ दहिवली - कर्जत " यांचा पुढाकार !

स्पर्धेचे विजेतेपद ” नेरळ टायगर्स ” या संघाने तर उपविजेते पद ” वैष्णवी इलेव्हन कर्जत ” या संघाने पटकावले…..

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन ” ४० + क्रिकेट संघटना व इलेव्हन स्टार संघ दहिवली – कर्जत ” यांच्या पुढाकाराने ” महिला शक्ती ४० + चषक स्पर्धा ” बामचा मळा मैदान दहिवली येथे यशस्वीरित्या व मोठ्या उत्साहात संपन्न झाली. दरवर्षी कर्जत ४० + क्रिकेट संघटना विविध सामाजिक संकल्पनेवर आधारित समाजासाठी एक संदेश देण्या उद्देशाने स्पर्धा आयोजित करत आलेले आहेत . यावर्षी आपल्या समाजातील तसेच परिवारातील महिलांचा सन्मान म्हणुन त्यांच्या नावाने ही स्पर्धा समर्पित करण्यात आली. यावेळी तालुक्यातील अनेक क्रिकेट टिम ने या स्पर्धेत भाग घेऊन आपला खेळ दाखविला.   

          यावेळी महिला क्रिकेट ला प्रोत्साहन म्हणुन स्पर्धेला सुरुवात करताना JSW कंपनी डोलवी, पेण व YSCC कर्जत महिला संघ यांच्या बरोबर एक प्रेक्षणीय सामना आयोजित केला होता . त्यामध्ये YSCC कर्जत महिला संघाने हा सामना जिंकुन कर्जत मधील महिला व मुलींचा संघ हा कधीच कुठे कमी नाही , हे दाखवून दिले. याप्रसंगी स्पर्धेला कर्जत नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. पुष्पाताई दगडे , उप नगराध्यक्ष संतोष दादा पाटील , नगरसेवक राजाभाऊ कोठारी सर , पत्रकार विजय मांडे , दहिवली गाव परिसर विचारमंचचे सुनील जाधव , पाणी पुरवठा सभापती सुचिता देवेंद्र खोत , महिला व बाल कल्याण सभापती हर्षाली उमेश गायकवाड , उपसभापती अंजली अतुल कडु , नगरसेविका मानसी महेंद्र कानिटकर, नगरसेविका सुमिता योगेश गायकवाड , बांधकाम सभापती महेंद्र चंदन पाटील, नगरसेविका राधिका पवार , नगरसेवक प्रशांत पाटील, माजी नगराध्यक्षा रजनी ताई रामदास गायकवाड, माजी नगरसेविका सुवर्णा ताई नीलधे , यांनी सदिच्छा भेट दिली . यावेळी संघटनेतर्फे सर्व नगरसेवक – नगरसेविकांचे व मान्यवरांचा यथोचित सन्मान सत्कार करण्यात आला.

         स्पर्धेमध्ये इलेव्हन स्टार दहिवली – कर्जत, शेलू इलेव्हन, मास्टर्स इलेव्हन नेरळ, जय हनुमान ब्रदर्स ११ कशेळे, वैष्णवी इलेव्हन, मॉर्निंग सुपर स्टार, नेरळ टायगर्स, वीर हुतात्मा हिराजी पाटील संघ, भिवपुरी सुपर स्टार असे कर्जत ४० + संघटनेचे ९ संघ व विशेष निमंत्रित कोपरान कंपनी चा एक असे दहा संघ सहभागी झाले होते.

जय हनुमान ब्रदर्स ११ कशेळे हा संघ कशेळे या ग्रामीण विभागातून पहिल्यांदा खेळला व सेमीफायनल पर्यंत मजल मारून या संघाने आपली छाप पाडली. स्पर्धेचे विजेतेपद ” नेरळ टायगर्स ” या संघाने तर उपविजेते पद ” वैष्णवी इलेव्हन कर्जत ” या संघाने पटकावले. स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अजय घरत, उत्कृष्ट फलंदाज नितीन मोरगे, उत्कृष्ट गोलंदाज सुनील अहिर तर मालिकावीर तानाजी कडु यांची निवड करण्यात आली. स्पर्धेचा बक्षीस समारंभ सर्व महिलांच्या हस्ते करण्यात आला हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य होते.

          स्पर्धेचे प्रमुख आकर्षण म्हणजे कर्जत ४० + क्रिकेट परिवारातील घरातील महिला व कर्जत मधील ” सानिया शैलेश खोब्रागडे ” ही खेळाडू जिने कर्जत चे नाव रोशन केले , तसेच समाजात तळागाळातील लोकांसाठी काम करणाऱ्या अंकिता पवार यांचा सन्मान करण्यात आला. स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे संघटनेच्या ब्रीद वाक्याप्रमाणे एक धाव आरोग्यासाठी व पुन्हा एकदा तारुण्याकडे तसेच खेळामधून एक पाऊल समाजासाठी म्हणुन स्पर्धेला रोख रक्कम न ठेवता फक्त आकर्षक चषक ठेवण्यात आले होते , तरीही सर्व संघानी चुरशीचा खेळ दाखवला.

सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संघटने चे संस्थापक श्री गजेंद्र दांडेकर, तसेच मार्गदर्शक सदस्य सर्वश्री मधु सुर्वे, शिरीष दिघे, महेंद्र निगुडकर, रणजीत जैन, विकास चित्ते (बापू), प्रवीण गांगल, विनायक परांजपे, सचिन मनोरे, राजू ओसवाल, साजन ओसवाल, विराग पाठक तसेच सदस्य दीपक राणे, गिरीश सुर्वे, बाळा धनवे, किरण देशमुख, भाई जाधव, राकेश गोरे, जितेंद्र कोल्हे , संदीप देशमुख, दीपंकार सालये, प्रशांत शिंदे, जयवंत पिंगळे, राकेश गुप्ता, पांडुरंग पाटील, पांडुरंग मोहिते, मंगेश म्हसे, चंद्रकांत दगडे, सुजित पवार, समीर चव्हाण, चेतन चिखलकर, रमेश मिसे, सुभाष पाटील, तुषार जोशी, रमेश पवार, प्रभाकर देशमुख, दिनेश राणे, विशाल निमकर्डे, सुरेश ठाकरे, किशोर देशमुख, सुभाष मिसाळ, जय उतेकर तसेच इतर सहकारी व संघटनेचे कार्याध्यक्ष दिनेश कडू व संघटनेचे अध्यक्ष श्री शशांक शेट्टी यांनी प्रचंड मेहनत घेऊन स्पर्धा यशस्वी केली.

        यावेळी पंच म्हणून जयवंत पिंगळे, संदीप देशमुख, गजेंद्र दांडेकर, शशांक शेट्टी, तुषार जोशी, दीपक राणे, प्रशांत शिंदे यांनी काम बघीतले. तर कॉमेन्ट्री योगेश ढोले, सचिन खैरे यांनी केली . सदर स्पर्धेचे उद्घाटन कर्जत ४० + चे मार्गदर्शक ज्येष्ठ सदस्य श्री.मधुकर सुर्वे आणि JSW Steel कंपनी , डोलवी पेण च्या कप्तान सौ . काळे मॅडम व YSCC कर्जत महिला कप्तान यांच्या हस्ते करण्यात आले . याप्रसंगी हि स्पर्धा आयोजित केल्याने शशांक शेट्टी  , अध्यक्ष – कर्जत ४० + क्रिकेट संघटना यांचे सर्वांनीच कौतुक केले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!