Uncategorized

…….” कर्जतमध्ये स्वच्छता अभियानाचे महापर्व “…….

" श्री सदस्य बांधवांचा " पुढाकार कर्जतकरांना प्रेरणादायी !

महाराष्ट्र भुषण , जेष्ठ निरुपणकार ” डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी ” यांची जयंती सामाजिक उपक्रमाने संपन्न ! 

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

नेहमीच सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणारे ” महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे ” श्री सदस्य बांधव कर्जत मध्ये स्वच्छता अभियानातून सर्वांना प्रेरणादायी संदेश देत असतात . यावेळी देखील कर्जत तालुक्यात रविवार दिनांक १ मार्च २०२६ रोजी ” महाराष्ट्र भुषण डाॅ. श्री नानासाहेब धर्माधिकारी ” यांचा जन्मदिवस या निमित्ताने कर्जत तालुक्यात ” महा स्वच्छता अभियान ” संपन्न झाले.

         

कर्जत नगरपालिकेच्या नगराध्यक्ष सौ. पुष्पाताई दगडे यांचे हस्ते डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे प्रतिमेचे पूजन करुन स्वच्छता अभियानास सुरुवात झाली. या प्रसंगी उपनगराध्यक्ष संतोष दादा पाटील , नगरसेवक व बांधकाम सभापती महेंद्र चंदन , पाणी पुरवठा सभापती नगरसेविका सुचिता खोत, महिला व बाल कल्याण उप सभापती अंजली कडू , नगरसेविका सुवर्णा जोशी , मानसी कानिटकर, नेहा शिंदे , योगेश आप्पा गायकवाड , अतुल कडू , स्वच्छता निरीक्षक व्यंकटेश रायन , स्वच्छता पर्यवेक्षक निकेश फाळे , राहूल गायकवाड , डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे वतीने भगवान भोसले, शंकर देशमुख , भानुदास पालकर व श्री सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

         

यावेळी संपूर्ण कर्जत नगर परिषद प्रभागात ही स्वच्छता अभियान श्री सदस्यांनी राबविले . यावेळी कर्जत नगरपालिका क्षेत्रात एकुण ६२८ श्री सदस्यांनी उपस्थिती दर्शवून स्वच्छता क्षेत्र – ५९२५ स्के. मिटर. , ओला कचरा – ३९०० किलो. , सुका कचरा – १२९०० किलो. , तर या अभियानात , नगर पालिका क्षेत्रात ८ कि.मी. रोड स्वच्छ करणेत आला. याप्रसंगी कर्जत तालुक्यांत श्री सदस्यां बरोबर स्थानिक संस्था , नागरिक , पदाधिकारी , शासकीय कार्यालये अधिकारी, कर्मचारी यांचे बहुमोल सहकार्य लाभले व स्वच्छता अभियानात सहभागी झाले. कर्जत नगरपालिका क्षेत्रा बरोबरच भिवपुरी, गौळवाडी , मुद्रे , पोसरी , बार्णे , पिंगळस, वावळोली , दहिवली , सावळे, वदप, भिसेगाव , वावर्ले , सांगवी येथील बैठकीतील सदस्यांनी स्वच्छता अभियानात सहभाग घेतला होता.

       

 कर्जत तालुक्यात या स्वच्छता अभियानास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. अनेक शासकीय अधिकारी व कर्जत नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष संतोष दादा पाटील यांनी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे डाॅ. आप्पासाहेब धर्माधिकारी, डॉ. सचिन दादा धर्माधिकारी यांचे आभार व्यक्त करत प्रतिष्ठानच्या या सामाजिक कार्याचा गौरव केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!