Uncategorized

…..” कर्जत पंचायत समितीवर परिवर्तन विकास आघाडीचा कोण होणार सभापती व उपसभापती ?…..”

" सत्ता स्थापना आणि नेतृत्वाचा आशीर्वाद सोहळा " ११ मार्च २०२६ रोजी होणार संपन्न !

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष तथा खासदार ” सुनीलजी तटकरे ” यांची विशेष उपस्थिती……

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

कर्जत पंचायत समितीवर ” परिवर्तन विकास आघाडीतील ” राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व इतर मित्र पक्षाने पंचायत समिती निवडणुकीत दैदित्यमान यश संपादन करून १२ पैकी १० उमेदवार विजयी झाले , त्यात राष्ट्रवादीचे ७ तर ठाकरे शिवसेनेचे ३ उमेदवार विजयी झाले त्यामुळे साहजिकच सभापती हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तर उपसभापती ठाकरे शिवसेनेचा असणार आहे . कर्जत तालुक्यातील जनतेचा विश्वास संपादन करून विकासाचा ध्यास घेऊन तालुक्याचा कायापालट करण्याचा मुहूर्त साधून कर्जत पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडीचा ऐतिहासिक सोहळा बुधवार दिनांक ११ मार्च २०२६ रोजी होणार असून या सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगडचे खासदार तथा प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे हे आशीर्वाद देण्यास उपस्थित रहाणार आहेत .

         

 कर्जत तालुक्याच्या जनतेने परिवर्तन विकास आघाडीवर दाखवलेला विश्वास आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे आज पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा व ठाकरे शिवसेनेचा झेंडा फडकला आहे . नवनियुक्त सभापती व उपसभापती निवडीचा ऐतिहासिक सोहळा – पदग्रहण समारंभ व आनंदोत्सवात आपण सर्वांनी उपस्थित राहून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन आणि निमंत्रण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्जत तालुका अध्यक्ष श्री. दिपक श्रीखंडे व श्री. बाजीराव दळवी – तालुकाप्रमुख, कर्जत तालुका शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) यांनी केले आहे . 

          बुधवार दिनांक ११ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ – ०० वाजता नामनिर्देशन अर्ज भरणे , स्थळ – पंचायत समिती कार्यालय, कर्जत येथे होणार असून दुपारी १२ – ०० ते २ – ०० वाजेपर्यंत भव्य स्नेहभोजन स्थळ – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय , दुपारी २ – ०० वाजता , त्यानंतर नवनियुक्त सभापती व उपसभापती यांची अधिकृत निवड व निवडीनंतर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा स्थळ – पंचायत समिती कार्यालय, कर्जत येथे होणार आहे . या सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे व ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत व नेतृत्वाखाली हा भव्य कार्यक्रम होणार आहे .  

       

मात्र सभापती कोण होणार ? हे अद्याप गुलदस्त्यात बंद असून नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण असल्याने सौ. नमिता सुधाकर घारे की भगवान शेठ चंचे हे प्रमुख दावेदार सभापती पदासाठी असल्याने पक्ष श्रेष्ठी कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात , याकडे आता सर्वांचेच लक्ष लागून आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!