……” कर्जत पंचायत समितीच्या सभापती पदी सौ. नमिता घारे तर उपसभापती पदी सौ. चित्रा ठाकरे विराजमान “……
पदग्रहण सोहळ्यास " राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष - खासदार सुनील तटकरे " यांची उपस्थिती !

जनतेने ” परिवर्तन ” घडवले आता कर्जत तालुक्यात ” विकासाने ” परिवर्तन होणार……
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत पंचायत समितीच्या सभापती पदी नुकतीच बीड पंचायत समिती गणातून निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ” सौ. नमिता सुधाकर घारे ” यांची तर उपसभापती पदी वेणगाव पंचायत समिती प्रभागातून निवडून आलेल्या ठाकरे शिवसेनेच्या ” सौ. चित्रा जगदीश ठाकरे ” यांची बिनविरोध निवड झाली आहे . काल बुधवार दिनांक ११ मार्च २०२६ रोजी हा सोहळा संपन्न झाला असून या पदग्रहण सोहळ्यास राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष तथा खासदार ” सुनीलजी तटकरे ” हे उपस्थित राहून त्यांनी नवनिर्वाचित सभापती – उपसभापती यांना आशीर्वाद दिले .
कर्जत पंचायत समितीवर परिवर्तन विकास आघाडीने एकहाती सत्ता मिळवली असल्याने त्यात १२ जागांपैकी राष्ट्रवादीचे ६ तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे ४ उमेदवार निवडून आले आहेत . त्यामुळे साहजिकच परिवर्तन विकास आघाडीचा झेंडा कर्जत पंचायत समितीवर फडकला आहे . राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ” सुधाकर भाऊ घारे ” व ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख ” नितीन दादा सावंत ” यांच्या नेतृत्वाची विजयी वाटचाल आता कर्जत तालुक्यात पहाण्यास मिळणार आहे .
या भव्य पदग्रहण ऐतिहासिक सोहळ्यास राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे , जिल्हाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे , उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत , जिल्हा उपाध्यक्ष अशोक शेठ भोपतराव , बंधू पाटील , तालुका अध्यक्ष दिपक श्रीखंडे , तालुका प्रमुख बाजीराव दळवी , नगराध्यक्षा पुष्पा ताई हरिश्चंद्र दगडे , माजी नगराध्यक्षा तथा नगरसेविका सुवर्णा जोशी , महिला अध्यक्षा ॲड. रंजना धुळे , हालिवली माजी सरपंच सौ. प्रमिला बोराडे , शहर अध्यक्ष भगवान शेठ भोईर , केतन बेलोसे , सर्व नगरसेवक , त्याचप्रमाणे पंचायत समिती सदस्य भगवान शेठ चंचे, कमलाबाई शिंगवा, अक्षय तिटकारे, कविता पादीर, नमिता श्रीखंडे, महेश खारीक, नितीन धुळे, सुषमा पवाळी आदी उपस्थित होते. तर पदग्रहण समारंभ आणि आनंदोत्सवात आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच कर्जत तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक कर्जत पंचायत समिती कार्यालयात झाली. पीठासन अधिकारी तहसीलदार डॉ. धनंजय जाधव व निवडणूक प्रक्रियेस गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांनी सहकार्य केले. हा भव्य सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला. जनतेने परिवर्तन घडवून आणले आता कर्जत तालुक्याचा विकास घडवून परिवर्तन होईल , असा निर्धार याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.




