Uncategorized

….” कर्जत मध्ये जागतिक महिला दिनी एक धाव मुलींच्या सक्षमीकरणासाठीची “…….

कन्याथॉन - २०२६ मध्ये " विजयभूमी युनिव्हर्सलचा " स्तुत्य सहभाग !

कार्यसम्राट आमदार ” महेंद्र शेठ थोरवे ” यांच्या शुभहस्ते पोसरी येथे उद्घाटन …..

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील कर्जत तालुक्यात मुलींच्या शिक्षण – कला – क्रीडा – आधुनिक तंत्रज्ञान – स्वातंत्र्य – अधिकार – न्याय या सर्वांत अधिकार मिळण्यासाठी एक धाव मुलींच्या सक्षमीकरणासाठी ” कन्याथॉन २०२६ ” हा कार्यक्रम ८ मार्च २०२६ रोजी ” जागतिक महिला दिनी ” कार्यसम्राट आमदार ” महेंद्र शेठ थोरवे ” यांच्या नेतृत्वाखाली व ” विजयभूमी युनिव्हर्सल ” या महाविद्यालयाच्या सहभागातून होणार असून या भव्य कार्यक्रमाचे उद्घाटन कर्जत खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे . 

      चला, ” मुलींच्या सक्षमीकरणासाठी एकत्र धावूया ” या स्तुत्य उपक्रमाची सुरुवात रविवार, ०८ मार्च २०२६ वेळ – सकाळी ६.०० वाजता स्थळ – शिवतीर्थ, पोसरी ग्राउंड, कर्जत येथून होणार आहे . सर्व सहभागींसाठी मोफत टी-शर्ट आणि नाश्ता दिला जाणार असून विजेत्यांना पदके, प्रमाणपत्रे आणि रोख बक्षिसे दिली जाणार आहेत . यामध्ये १० कि. मी. धावणे – विजेते ( पुरुष व महिला ) १० हजार रोख पारितोषिक , ५ कि. मी. धावणे – विजेते ( पुरुष व महिला ) रोख पारितोषिक ५,००० हजार , ३ कि. मी. धावणे , विजेते ( पुरुष व महिला ) रोख पारितोषिक २,००० हजार , आहे 

          या स्तुत्य उपक्रमा बाबत अधिक माहितीसाठी कृपया खालील क्रमांकावर संपर्क करा , मोबाईल- 9082023823 , 75062 62789 व या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे . 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!