……” कर्जत दहिवली येथे होणार प्रकाश झोतात नाईट क्रिकेटचा थरार “……
सौ. रितु हर्षल मोरे - ठोंबरे वहिनीसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट सामन्यांत लाखोंची बक्षिसे !

” युवक अध्यक्ष चषक २०२६ ” राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष ” हर्षल भाऊ नंदकुमार मोरे ” यांचा पुढाकार……
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत नगर परिषद हद्दीतील दहिवली प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्जत शहर युवक अध्यक्ष ” हर्षल भाऊ नंदकुमार मोरे ” यांच्या नेतृत्वाखाली ” युवक अध्यक्ष चषक २०२६ ” चा क्रिकेट सामन्यांचा प्रकाश झोतातील (नाईट ) ” थरार ” बाम चा मळा या भव्य ग्राऊंडवर सोमवार दिनांक ३० मार्च ते ०२ एप्रिल २०२६ पर्यंत खेळवला जाणार असून या सामन्यांना ” भव्य बक्षिसे व लाखोंचे पारितोषिक ” असल्याने या क्रिकेटच्या थरार कडे संपूर्ण क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागून आहे . सदरचे क्रिकेट सामने हे चौक ग्रामपंचायतीच्या सरपंच व हर्षल मोरे यांच्या पत्नी ” सौ. रितु हर्षल मोरे – ठोंबरे ” वहिनीसाहेब यांच्या ०२ एप्रिल रोजीच्या वाढदिवसानिमित्त ठेवण्यात आले आहेत .
कर्जतच्या क्रिकेट ” विश्वात ” पुन्हा एकदा क्रिकेट खेळाला मजबुती देवून क्रिकेट खेळाडूंना ” भरारी ” घेण्यासाठी कला – क्रीडा – क्षेत्रातील एक नामांकित व्यक्तिमत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्जत शहर युवक अध्यक्ष ” हर्षल भाऊ मोरे ” हे दरवर्षी प्राधान्य देत असतात . या ” युवक अध्यक्ष चषक २०२६ ” क्रिकेट सामन्यांत प्रथम पारितोधिक 1,50,000/- व आकर्षक चषक , द्वितीय पारितोषिक 75,000/- व आकर्षक चषक , तृतीय पारितोषिक 35,000/- व आकर्षक चषक , चतुर्थ पारितोषिक्त 35,000/- व आकर्षक चषक , अशा भव्य रक्कमेची पारितोषिक असून मालिकावीर , उत्कृष्ट फलंदाज , उत्कृष्ट गोलंदाज , उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे निवडले जाणार असून त्यांना हि भव्य आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत , तर सामने बघणाऱ्या क्रिकेट प्रेमींसाठी विनामूल्य ” लकी ड्रॉ ” , तसेच महिलांना मानाची ” पैठणी साडी ” बक्षिसे देण्यात येणार आहेत . या सामन्यांना सेलिब्रिटी उपस्थित रहाणार असून हे क्रिकेटचे सामने खूपच रंगतदार होणार आहेत .
सदरचे सामने ठिकाण – दहिवली गावचे भव्य मैदान ( बामचा मळा ) येथे खेळवले जाणार असून या सामन्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष तथा खासदार सुनीलजी तटकरे , महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा राजिप चे माजी उपाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे , व इतर मान्यवर उपस्थित रहाणार असल्याने तर येथे नवनिर्वाचित कर्जत नगर परिषदेत निवडून आलेले नगराध्यक्षा , नगरसेवक – नगरसेविका , तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांचा देखील भव्य सत्कार होणार असल्याने हे सामने ” न भूतो न भविष्यती ” असे होणार आहेत .




