Uncategorized

…..” दहिवली येथे आर पी आय पक्षाचा झेंडा डौलाने फडकत ठेवणारा स्वाभिमानी – झुंझार युवा नेता राहुल भाई गायकवाड “……

९० टक्के " समाजकारण " व १० टक्के " राजकारण " करणारा जन माणसातील समाजसेवक !

पैसा तर सर्वच कमावतात , पण कार्यातून आपले नाव कमवा , तेच सर्वांच्या लक्षात रहाते……

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

एकीकडे या जगात सर्वच माणसे ” पैसा ” कमावणे , आपले नाव कसे ” प्रसिद्धीत ” येईल असा विचार करून कार्य करत असताना , दुसरीकडे फक्त समाजसेवेसाठी वाहून घेतलेले एक नाव गेली २० वर्षे कर्जत नगर परिषद हद्दीतील दहिवली प्रभागात गाजत आहे . ९० टक्के ” समाजकारण ” व १० टक्के ” राजकारण ” करत जनसामान्य नागरिकांच्या मदतीला धावत जाऊन समस्या सोडविण्यात हातखंडा असलेला ” छत्रपती – फुले – शाहू – आंबेडकरी ” विचार धारेचा तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) या पक्षाचा निष्ठावंत सच्चा कार्यकर्ता म्हणून कार्यरत असलेला ” राहुल भाई रघुनाथ गायकवाड ” सर्वांच्याच परिचयाचा आहे .

         

अतिशय हलाखीच्या परिस्थितीत कर्जत नगर परिषद हद्दीतील दहिवली प्रभागात राहणारा आई कुसुम रघुनाथ गायकवाड व वडील रघुनाथ गोविंद गायकवाड यांचा मुलगा म्हणजे ” राहुल भाई “. अतिशय गरिबीचे दिवस , वडील मोल मजुरी करायचे , राहुल भाईला सुद्धा लहानपणा पासून मेहनत करण्याची आवड व तीच मेहनत करून आपल्या आयुष्याला ” चालना ” देत सर्वांना मदतीचा हात देत ” स्वाभिमानी ” जगत , त्यांनी नाव कमावले . राहुल भाई म्हणतात , पैसा तर सर्वच कमावतात पण कार्यातून नाव कमावले तर आपले आयुष्य संपल्यानंतर देखील सर्वांच्याच लक्षात रहाते , म्हणूनच सर्वापेक्षा एक पाऊल पुढे जात ते ९० टक्के ” समाजसेवा ” करतात .

       

नेतृत्व गुण राहुल भाई यांच्या अंगी असल्याने त्यांनी कर्जत नगर परिषद कर्मचारी वर्गा साठी ” युनियन एम्प्लॉईज ” या युनियन संघटनेचा आधार घेत युनियनचे अध्यक्ष ॲड . सुरेश ठाकूर साहेब , सरचिटणीस अनिल दादा जाधव , कार्याध्यक्ष संतोष पवार साहेब यांच्या हाताखाली राहून कामगार वर्गासाठी , त्यांचे हक्क अधिकारासाठी झटत आहे . त्यामाध्यमातून कर्मचाऱ्यांचे किमान वेतन कसे वाढले जाईल ? त्यांच्या आरोग्याची काळजी , कर्मचाऱ्यांवर होणारे अन्याय अत्याचार कसे थांबले पाहिजे , याचा धडा त्यांनी शिकला व अगदी प्रामाणिकपणे कर्मचाऱ्यांसाठी वेळोवेळी धावत राहिले . वीस वर्ष कर्जत नगरपरिषद मध्ये कंत्राटी बेसवर सफाई कामगार म्हणून काम करत असतांना आपल्या आयुष्याला स्वतःच्या हिमतीवर एक वेगळीच दिशा देऊन आपल्या कामाच्या जोरावर व लोकांचा विश्वास जपून वेळोवेळी लोकांची कामे ताबडतोब करून ” सुपरवायझर ” हे पद देखील अगदी प्रामाणिकपणे ते सांभाळत आहेत . आर पी आय पक्षाचे कर्जत तालुका युवक महासचिव पदावर काम करत राजकीय क्षेत्रात झालेल्या निवडणुकीत यशाचा डोंगर दिसून सुद्धा पक्ष नेतृत्वाच्या आदेशाने त्यांनी शांत बसून विरोधकांना त्यांची जागा दाखवली . एकीकडे लोक खुर्चीसाठी सर्व काही सोडून जातात परंतु राहुल भाई गायकवाड , एकमेव व्यक्ती असा आहे की , रिपब्लिकन पक्षाचे काम करत पक्षाने दिलेला आदेश कुठेही बंडखोरी न करता शांतपणे पक्षाशी प्रामाणिक राहिले .

            जन माणसांच्या मनात घर केलेले समाजसेवक राहुल भाई दहिवली प्रभाग क्रमांक ०८ मध्ये नागरिकांच्या पाणी , आरोग्य , स्वच्छता , शौचालय , रस्ते या समस्येसाठी नेहमीच अग्रेसर राहून प्रसंगी उपोषण , निवेदने देवून झुंज देत आहेत . आर पी आय पक्षाच्या माध्यमातून दहिवली परिसरात आरोग्य शिबिर , रक्तदान शिबिर , आभा कार्ड शिबिर मोफत राबवून नागरिकांची सेवा ते करत आले आहेत . कोरोना काळात देखील त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली होती . रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे झुंझार युवा नेतृत्व , कामगार नेते ” राहुल भाई गायकवाड ” यांच्यामुळेच आज दहिवली प्रभागात आर पी आय पक्षाचा ” निळा झेंडा ” डौलाने फडकत आहे . आर पी आय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशाने व कोकण प्रदेश कार्याध्यक्ष राहुलजी डाळींबकर , कर्जत तालुका प्रभारी अध्यक्ष मनोज गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली व सर्व पदाधिकारी – कार्यकर्ते यांच्या साथीने कर्जत तालुका किंवा कर्जत शहरातील प्रत्येक अन्याय अत्याचारा विरोधातील आंदोलनात , निवेदन देण्यास , निषेध मोर्चात , आमरण उपोषणात नेहमीच अग्रेसर राहून न्याय मिळवून देत आहेत . 

       

आज मंगळवार दिनांक २४ मार्च २०२६ रोजी या राजकीय क्षितिजावर उत्तुंग भरारी घेणाऱ्या , जन माणसांच्या हृदयावर समाज सेवा करून छाप पाडणाऱ्या ” राहुल भाई गायकवाड ” या ” समाजसेवकाच्या ” वाढदिवशी , त्यांच्या सर्व इच्छा – आशा – आकांक्षा पूर्ण होवो , त्यांचे आरोग्य सुदृढ राहो , हीच भगवंत चरणी प्रार्थना व खूप खूप शुभेच्छा !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!