……” अखेर कर्जत नगर परिषद व उपजिल्हा रुग्णालय प्रशासन झुकले “……
सर्व मागण्या मान्य करून लेखी आश्वासन दिल्याने " आमरण उपोषण " तूर्तास स्थगित !

पोलीस मित्र संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ” रमेश दादा कदम ” यांचे पुन्हा एकदा यश ……
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील गलथान कारभार , सेवा सुविधांचा अभाव व गैरकारभाराची चौकशी करणे कामी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निशिकांत पाटील यांनी चौकशी समिती स्थापन करून चौकशी सुरू केली असून व सर्व मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले, तर
कर्जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनी १ ते १२ मागण्या पूर्ण करून व नगरपरिषद मध्ये नगरपरिषदेचे अधिकारी यांच्या समवेत समस्यांची पाहणी करण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्याने या दोन्ही कार्यालयाने मागण्या मान्य करून लेखी आश्वासन दिल्यामुळे पोलीस मित्र संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश दादा कदम यांनी तूर्तास उपोषण स्थगित केले आहे .
कर्जत तालुक्यातील नागरिकांना सर्व प्रकारच्या आरोग्याच्या सोयी सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी करूनही येथे कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक ( मनोरुग्ण तज्ञ ) म्हस्कर यांचा मनमानी कारभार बळावत चालला होता . तर कर्जत नगर परिषदेच्या प्रशासकीय काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांच्यावर करत नागरिकांना बकाल जीवन जगण्यास भाग पाडण्यास मुख्याधिकारी ” तानाजी चव्हाण ” हे अग्रेसर असल्याने या विरोधात सर्व सामान्य जनतेस न्याय देण्यासाठी ” पोलीस मित्र संघटनेने ” दंड थोपटले होते.
उपजिल्हा रुग्णालय कर्जत यांच्या विरोधात १२ मागण्या तर कर्जत नगर परिषदेच्या विरोधात ११ मागण्या घेऊन ” आर पार ची लढाई ” आमरण उपोषणाने लढले . यांत ३ दिवस चाललेल्या या लढ्याला अखेर २७ फेब्रुवारी २०२६ रोजी यश मिळाले असून त्यांच्या सर्व मागण्या मान्य करून त्याची पूर्तता करण्याचे लेखी आश्वासन दोन्ही प्रशासन अधिकारी यांनी दिले आहे .
कर्जत शहरात या आंदोलनास यश आल्याने रमेश दादा कदम यांचे ३३ वे आमरण उपोषण यशस्वी झाले आहे . यावेळी कर्जत तालुक्यातील अनेक राजकीय व सामाजिक संघटनेच्या मान्यवरांनी , नगरसेवकांनी , व्यापारी वर्ग , नागरिकांनी या उपोषणाला भेटी दिल्या होत्या .




